वाशिम ,दि.२२ मार्च (जिमाका): टपाल विभागाच्या वतीने माफक दरात जनरल इन्शुरन्स / अपघाती विमा सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याअंतर्गत रु. ५४९/- मध्ये १० लाखांचा विमा आणि रु. ७४९/- मध्ये १५ लाखांपर्यंतचा विमा दिला जातो. या योजनेत ओपीडी खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक मदत, टेली समुपदेशन यांसारख्या सुविधा आहेत.
नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळावा यासाठी मंगळवार आणि बुधवार, २५ व २६ मार्च २०२५ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्या निर्देशानुसार ही मोहिम राबवली जात आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा उपलब्ध आहे.
विमा मिळवण्यासाठी फक्त आधार क्रमांक आवश्यक असून, तो मोबाईल नंबरशी जोडलेला असावा.
जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, टपाल विभाग व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून विमा घेत आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेची खात्री करावी.
अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा. असे अकोला विभागाचे प्रवर अधीक्षक सी.व्ही. रामीरेड्डी यांनी कळविले आहे.