वाशिम, (जिमाका) : राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजना ही राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद या कार्यालयामार्फत राबविण्यात येते.
या योजनेअंतर्गत साहित्य किंवा कलाक्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्ष इतक्या प्रदिर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली अशा कलावंतांना सांस्कृतिक कार्य संचालक यांच्या स्तरावरुन दरमहा ऑनलाईन पद्धतीने मानधन अदा केले जाते. शासन निर्णयानुसार इष्ठांकानुसार १०० कलावंतांची निवड, वर्ग-अ,ब,क प्रमाणे दरवर्षी केली जाते.
वाशिम जिल्ह्यात सन २०१९ पासून समिती गठित नसल्याने, सन २०१९ ते २०२३-२४ पर्यंत एकूण ८७६ अर्ज प्रलंबित आहे. प्राप्त अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे प्रस्तावासह अप्राप्त असल्या कारणाने कागदपत्रांची पूर्तता १० मार्चपर्यंत करणे आवश्यक होते. आवश्यक कागदपत्रांमध्ये जन्मतारखेचा दाखला हा ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत किंवा नगरपरिषद किंवा महानगरपालिकेच्या जन्मनोंदवहीच्या उतार्याची साक्षांकीत प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा निवडणूक मतदार यादीतील नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा युआयडी प्रमाणपत्र किंवा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकिय वैद्यकिय अधिकार्यांनी दिलेला वयाचा दाखला यापैकी एकही वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, कला वाड्मय क्षेत्रात १५ ते २० वर्षे इतक्या प्रदिर्घ काळासाठी महत्वपुर्ण कामगिरी केली आहे. असा किमान १५ वर्षाचा पुरावा वरील आवश्यक कागदपत्रे प्रस्तावासह नसल्याने, अर्ज अपात्र ठरलेला असल्याने आवश्यक कागदत्रांची पूर्तता १० मार्चपर्यंत कार्यालयास सादर करावे आहे. या योजनेच्या शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता १० मार्चपर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद वाशिम या कार्यालयास करावी. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांच्या अर्जाचा विचार पुढील प्रक्रियेसाठी करण्यात येणार नाही. याची नोंद लाभार्थ्यांनी घ्यावी, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ