Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम = पंचशिलनगरच्या शांतनुची नेपाळमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड : बालेवाडी पुणे येथे धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी : संविधान ग्रुप व सामाजीक संघटनांच्या वतीने भावपुर्ण सत्कार

वाशिम - श्रमिकांची वस्ती असलेल्या शहरातील पंचशिलनगर येथील रोजमजुरी करुन आपले पोट भरणार्‍या वर्षा इंगोले यांचा मुलगा शांतनु याने बालेवाडी स्टेडीयम पुणे येथे झालेल्या नॅशनल चॅम्पीयनशिप मध्ये १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन सुवर्णपदक पटकावल्यामुळे त्याची १ ते ५ जुन दरम्यान नेपाळमध्ये होणार्‍या इंडो नेपाळ चॅम्पीयनशिप २०२३ व कबडी आणि अ‍ॅथलेटीक्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासंदर्भातील पत्र शांतनुला २९ एप्रिल रोजी प्राप्त झाले आहे. शांतनुला मिळालेल्या या यशाबद्दल बुध्दपोर्णिमेच्या दिवशी झालेल्या एका कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे प्रश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिध्दार्थ देवळे यांच्या मार्गदर्शनात संविधान ग्रुप, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चॅरिटेबल अँड वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कांबळे, पी.एस. खंदारे, दिपक डोंगरदिवे, कुसुमताई सोनोने, सुरज खडसे आदींच्या हस्ते शांतनुचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कामगार व श्रमिकांची वस्ती असलेल्या पंचशिलनगर भागातुन याआधीही अनेक होतकरु विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा आणि खेळाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. शिवाय पंचशिलनगरचे नावही उज्वल केले आहे. याआधीही दहावीमध्ये बोर्डातुन प्रथम व एमबीबीएस मध्ये प्रथम येण्याचा बहुमान पंचशिलनगरातील गुणवंत मुलांना प्राप्त आहे. नेपाळमध्ये होणार्‍या पुढील क्रीडा स्पर्धेव्दारे उज्वल भविष्य घडवून वाशिम जिल्ह्याचे नाव उज्वल करण्यासाठी गरीब व होतकरु असलेल्या शांतनुला शासन व प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरीकांमधून पुढे येत आहे.