वाशिम - क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांनी सर्वात प्रथम स्थापन लोकशाही संसदेची स्थापना केलेल्या व समकालीन शरणांची कायकभूमी असलेल्या बिदर जिल्हयातील बसवकल्याण नगरीत येत्या २६ व २७ नोव्हेंबरला महाराष्ट्र बसव परिषद व विश्व बसव धर्म ट्रस्टच्या वतीने व परमपूज्य डॉ. बसवलिंग पट्टद्देवरु यांच्या दिव्य नेतृत्वात राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात जिल्हयातील विरशैव लिंगायत समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र बसव परिषदेच्या वतीने प्रा. काशिनाथआप्पा लाव्हरे यांनी केले आहे.
बसवादी शरणांच्या अनुभव मंटप संस्कृतीचे सच्चे वारसदार असलेल्या भालकी हिरेमठ संस्थानचे मठाधीश आणि महाराष्ट्र बसव परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परम पूज्य श्री डॉ. बसवलिंग पट्टद्देवरू अप्पाजी कर्नाटकासह महाराष्ट्र व तेलंगण राज्यात बसव विचार प्रसाराचे कार्य गत तीन-चार दशकांपासून निरंतरपणे करीत आहेत. विशेषतः महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून पूज्य अप्पाजींनी महात्मा बसवण्णांच्या विचारधारेवर आधारित १८५ हून अधिक मराठी पुस्तके प्रकाशित केली आहेत. २०१२ साली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात बसव संदेश यात्रा काढून बसवविचारांचा प्रसार केला आहे. राज्यस्तरीय बसव परिषदा, जिल्हा- तालुका बसव संमेलने, वचन ग्रंथदिंडी, अनुभव मंटप परीक्षा, निबंध-काव्य स्पर्धा असे विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. भारतभर विखुरलेला हा समाज आणि सर्व समतावादी विचारधारा एकत्र याव्यात या उदात्त हेतूने गत ४२ वर्षापासून पूज्य अप्पाजी प्रतिवर्षी ’राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सव’ आयोजनाची परंपरा जोपासत आहेत. हा उत्सव दोन दिवस चालणार असून शनिवार, २६ नोव्हेंबरला ध्वजारोहण, उद्घाटन समारंभ, चिंतन सभा आणि मराठीतील ८ ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. रविवारी २७ नोव्हेंबरला सामूहिक इष्टलिंग योग, मराठी व्याख्यान सत्र,समारोप समारंभ संपन्न होईल. मराठीतील ८ ग्रंथांच्या प्रकाशनामध्ये विश्वज्योती म. बसवण्णांची वचन गाथा, बसवयुगीन शरणांची वचने, बसवोत्तरयुगीन शरणांची वचने, वीरशरण हरळय्या, स्वातंत्र्यलढ्यात लिंगायतांचे योगदान, वचनांतील मूल्यशिक्षण, महाजंगम पू. श्री डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, लिंगायत धर्म आणि संस्कृती या ग्रंथाचा समावेश आहे. करीत आहेत. विशेषतः महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून पूज्य अप्पाजींनी महात्मा बसवण्णांच्या विचारधारेवर आधारित १८५ हून अधिक मराठी पुस्तके प्रकाशित केली आहेत. २०१२ साली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात बसव संदेश यात्रा काढून बसवविचारांचा प्रसार केला आहे. राज्यस्तरीय बसव परिषदा, जिल्हा- तालुका बसव संमेलने, वचन ग्रंथदिंडी, अनुभव मंटप परीक्षा, निबंध-काव्य स्पर्धा असे विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. हा उत्सव म्हणजे मानवी स्वातंत्र्य, समानता आणि विश्वबंधुत्व ही आपल्या संविधानाने बहाल केलेल्या मूल्यांचा उत्सव होय. हा उत्सव समाज व राष्ट्राच्या विकासास प्रेरक व्हावा म्हणून देशभरातील अनेक सत्यसंशोधक, विचारवंत, साहित्यिक, धर्मचिंतक आणि राजकीय मान्यवर यांना आमंत्रित केले आहे. या दोन दिवशीय कार्यक्रमात समतातत्त्वाधारीत भव्य भारताचे निर्माण करण्यासाठी चिंतन-मंथन होणार आहे. तरी समाजबांधवांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र बसव परिषदेचे राज्याध्यक्ष बी. एम. पाटील, संचालक राजू ब. जुबरे व प्रा. काशिनाथ लाव्हरे यांनी केले आहे.