
वाशिम - शहरातील स्थानिक शुक्रवारपेठ भागातील बाळसमुद्र मंदिर, विठ्ठल मंदिर, शिवालय मंदिर या परिसरातील खांबावर व डीपीवर नेहमीच शार्टसर्कीट व स्पार्कीग होते. या भागातील काही पोल वाकलेले आहेत. तर अनेक घरांवर धोकादायकरित्या विद्युत तारा लोंबकळलेल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे जनजीवन धोक्यात आले असून या समस्या दुर करुन रहिवाशांना सुरक्षित करण्यासाठी बाळसमुद्र प्रतिष्ठानच्या वतीने सहाय्यक अभियंता, महावितरण यांना २१ मार्च रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, बाळसमुद्र मंदिर ते विठ्ठल मंदिर व शिवालय मंदिर या दरम्यानच्या भागातील विजेचे नेहमीच लपंडाव होत असल्यामुळे भारनियमनाची परिस्थिती आहे. येथील विद्युत खांब व डीपीवर शॉटसर्कीट व स्पार्कीग होत राहते. व्होल्टेज सुध्दा कमी राहते. रहिवाशांच्या घरावरुन गेलेल्या काही विद्युत तारा सुध्दा लोंबकळलेल्या आहेत. त्यातच बाळसमुद्र परिसरातील एक विद्युत पोल सुध्दा वाकलेला आहे. या भागात कमी व्होल्टेजची समस्या नेहमीच राहते. काही खांबाचे पोल अर्थिग मारतात. त्यामुळे या भागातील नागरीक त्रस्त झाले असून त्यांच्या जिविताला धोका उत्पन्न झाला आहे. विजेच्या या सर्व समस्यांचा तातडीने निपटारा करुन नागरीकांनााबाबत आपण तातडीने कार्यवाही करुन नागरीकांच्या समस्या दुर कराव्या अशी मागणी बाळसमुद्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच आठ दिवसाच्या समस्या दुर न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतांना नितीन उचितकर, मोहन कोल्हे, विशाल उगले, महेश ढवळे, राहुल ठाकरे, निलेश व्यवहारे, अंकीत व्यवहारे, ईश्वर व्यवहारे, अजय व्यवहारे, सचिन व्यवहारे, राजु गंगाळे, संदीप व्यवहारे, राम इंगळे, आशिष व्यवहारे, विशाल गावंडे, हरिओम गावंडे, राहुल सरोदे, अक्षय व्यवहारे, योगेश ढवळे, अविनाश व्यवहारे, संतोष व्यवहारे आदी उपस्थित होते.