
वाशिम - दिव्यांगांसाठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्नातुन दिव्यांगांना ५ टक्के निधी वाटप करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची हाक दिली आहे. जिल्हाध्यक्ष मारोती मोळकर यांच्या नेतृत्वात २१ मार्च रोजी जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिव्यांगांना जिल्हयातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्नातुन ५ टक्के निधी वाटप करणे, पंचायतराज संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातुन ५ टक्के निधीबाबत जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करणे, दिव्यांगांना नविन, दुबार व विभक्त शिधापत्रिका देण्याबाबत कार्यवाही करणे, शासकीय रुग्णालयातुन दिव्यांगांना मिळणार्या ऑनलाईन प्रमाणपत्र वितरणाबाबत होत असलेल्या अडचणी व मनस्ताप दुर करणे, अपंगत्वाच्या प्रमाणपत्राकरीता रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करावा, मदत कक्षात एक खिडकी योजनेअतंर्गत सर्व सुविधा दिव्यांगांना तेथेच मिळाव्या, रुग्णालयातील सर्व उपचाराची सुविधा दिव्यांगांना तळमजल्यावरच देण्यात याव्या, दिव्यांगांना ने-आण करण्याकरीता व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करावी, दिव्यांगांशी असभ्य वर्तन करणार्या कर्मचार्यांना शास्ती लावावी आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष मारोती मोळकर, जिल्हा सल्लागार संतोष घुगे, तालुका सल्लागार ललित त्रिवेदी, जिल्हा संपर्कप्रमुख गंगुबाई पवार, सर्कल अध्यक्ष रामेश्वर खडसे, बजरंग मोरे, मालेगाव तालुकाध्यक्ष संतोष घुगे, तालुकासचिव दत्ता भगत, शहराध्यक्ष महेंद्र पखाले, जिल्हा सचिव शामराव खरात, जिल्हा सहसचिव अनिल भगत, दत्ता सुर्वे, अन्नपुर्णा तायडे, हसनशा शरीफशा, इंद्रजित ताजणे, बबन भगत, यशोदा घायाळ, मोहन खोरणे, आकाश सावळे, सतिश जाधव आदी उपस्थित होते.