Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम : परिश्रमपूर्वक वाटचाल केल्यास अपेक्षित यश सिद्धी - पोलीस उपनिरिक्षक चव्हाण : रासेयोच्या सात दिवशीय विशेष शिबीराला प्रारंभ : अनसिंग येथील जैन महाविद्यालयाचा पुढाकार


वाशिम - रासेयो शिबीर म्हणजे विद्यार्थ्यांना संस्कारयुक्त सामाजीक कार्य करण्याची एक चांगली संधी असून विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाची परिश्रमपूर्वक वाटचाल केल्यास अपेक्षीत यशसिध्दी निश्चितच मिळते असे प्रतिपादन पोलीस उपनिरिक्षक आनंद चव्हाण यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना केले.     


तालुक्यातील अनसिंग येथील श्री पदमप्रभ दिगंबर जैन कला महाविद्यालया अंतर्गत दत्तक ग्राम खडसिंग येथे २१ ते २७ मार्चदरम्यान पार पडणार्‍या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीराचा उद्घाटन कार्यक्रम २१ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाणे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुधाकर मानमोठे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पांढरे, नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक आनंद चव्हाण, अनिल शिंदे, गंगाधर पेचकवाढ, अंगणवाडी  सेविका संगिता कड उपस्थित होते. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनानंतर रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सचितानंद बिचेवार यांनी शिबीराचे प्रयोजन, विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रकल्प व प्रबोधन कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे पांडूरंग पांढरे यांनी खडसिंग ग्रामस्थांच्या दृष्टीकोनातून हे शिबीर कसे महत्त्वाचे आहे. यातून गावकरी-विद्यार्थी सुसंवाद साधला जाऊ शकतो हे सांगितले. अनिल शिंदे यांनी यशस्वी जीवनाची काही सूत्रे व माजी विद्यार्थी म्हणून असलेले आपले अनुभव यावेळी मांडले. रासेयो शिबीर म्हणजे विद्यार्थ्यांना संस्कारयुक्त घडण व सामाजिक कार्य करण्याची उत्तम संधी असून विद्यार्थ्यांनी यात भाग घ्यावा असे आवाहन प्रा. विवेक गुल्हाणे यांनी अध्यक्षीय मनोगतातुन केले. प्रास्ताविक व संचालन आकाश घटमाल व प्रतीक्षा सातव हिने तर आभार निलेश गिरी यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी रासेयोचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल जैन, प्रा. वैशाली गोरे यांच्यासह सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.