
वाशिम, दि. 22 (जिमाका) : राज्यातील नामांकित नियोक्तांकडुन प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र, वाशिम कार्यालयाकडुन पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ ते ३० मार्च दरम्यान ऑनलाईन पध्दतीने आयोजन केले आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात वाशिम जिल्हयासह राज्यातील नामांकित आस्थापना कंपन्यांमध्ये ८२ रिक्त जागेवर रोजगार मिळविण्याची संधी जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना या ऑनलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येईल. या रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, स्थापत्य कृषि पदविका/इतर सर्वशाखीय पदवीधर असणाऱ्या रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना त्यांच्याकडील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्ड मधुन मेळाव्यात सहभागी होता येईल.
सहभागी झालेल्या उमेदवारांना उद्योजकांकडुन ऑफलाईन वा ऑनलाईन पध्दतीने (कोविड-१९ चा प्रादुर्भाव विचारात घेवून) मुलाखत घेवून निवड करण्यात येणार आहे. तरी वाशिम जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने ३० मार्चपर्यंत पसंतीक्रम/सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्राच्या सहाय्यक आयुक्त, सुनंदा बजाज यांनी केले आहे.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची प्रक्रीया/पध्दत पुढीलप्रमाणे आहे. एम्पॉलमेंट कार्डमधील युझारनेम व पासवर्ड असावे. नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरून युझरनेम व पासवर्ड मिळवावा. त्यानंतर Job Seeker च्या विंडोमध्ये लॉगीन करुन डाव्या बाजुकडील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वर click करावे. त्यामध्ये वाशिम जिल्हा निवडुन त्यातील WASHIM JOB FAIR-4 (दि. १७ ते ३० मार्च २०२२) मध्ये नमुद पात्रतेनुसारच्याच पदांवर अप्लाय करावे. त्यावेळी Applied असा मेसेज दिसेल. अशा पध्दतीने या रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. अधिक माहितीकरीता या कार्यालयाच्या ०७२५२-२३१४९४ या दुरध्वनीवर संपर्क साधावा.