वाशिम - राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तथा जिल्ह्यातील वरिष्ठ कार्यकर्ते गजानन वैरागडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुंबई येथील मनसे कार्यालयात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेते अभिजीत पानसे, राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, आनंद एबंडवार, विठ्ठल लोखंडकर, विनय भोईटे, किर्तीकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात वाहतुक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय नाईक, सरचिटणीस आरिफ शेख व जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या हस्ते गजानन वैरागडे यांचे निवडीचे पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. वैरागडे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, मं.नाथ वाशिम विधानसभा चिटणीस विनोद सावके, कारंजा मानोरा विधानसभा चिटणीस शंकर घोडे, उपचिटणीस महंमद राजीक, महंमद सादीक, कारंजा शहर वाहतुक संघटक अब्दुल जशीम शेख आदींना दिले आहे. पक्षाची विचारधारा घराघरात रुजवुन जास्तीत जास्त युवकांना पक्षात संघटीत करुन राज ठाकरे यांचे हात बळकट करु अशी ग्वाही नियुक्तीदरम्यान वैरागडे यांनी दिली.