वाशिम - जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंह यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात उघडलेल्या गुटखाविरोधी धडक मोहीमेत रिसोडमध्ये आतापर्यतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल दीड कोटी रुपयाचा गुटख्याचा माल ताब्यात घेतला. याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात पोलीसांची प्रतिमा उंचावली असून जिपोअ बच्चनसिंह यांच्या कारवाईचे कौतूक होत आहे. या कारवाईमुळे जिल्हयातील गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यानी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासून अनेक उपक्रम हाती घेतले तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याकरीता वेळोवेळी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम शस्त्र अधिनीयम, दारुबंदी अधिनीयम, जुगार, अवैध गुटखा प्रकरणी कार्यवाही करुन गुन्हेगारांना कायदयाचा बडगा दाखविला आहे.
वाशिम जिल्हयात अवैध धंदयावर विशेष मोहीम राबविण्याचे सत्र सुरु असताना पो.स्टे रिसोड येथे यापुर्वी ११.५ क्विंटल गांजा जप्त करून विदर्भातील सर्वात मोठी रेड करुन आतापर्यंत १३ आरोपी अटक करण्यात आले आहेत. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांचे माहितीवरून एस. एम. जाधव, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा वाशिम यांचे पथक सपोनि मोहनकर व पथक यांनी २३/०१/२०२२ रोजी रिसोड शहरातील धोबी गल्ली येथील जुण्या इमारतील गुटखा विक्रेता सुनिल रामसुख तापडीया यांच्याकडे असलेला वेगवेगळया कंपनीचा सुमारे दीड कोटी रुपयाचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी जप्तीची करुन ०२ इसमांना ताब्यात घेवुन तंबाखुजन्य प्रतिबंधक कायदयान्वये कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच २० जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह व अपर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे याचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा वाशिम येथील ०३ पथक तयार करुन पो.स्टे. मानोरा हददीतील ग्राम कुपटा येथील अवैधरित्या वरली मटका साहित्यावर जुगार खेळणार्या लोकावर रेड करुन २४०३५० रुपयाचा मुददेमाल जप्त केला. पो.स्टे. मालेगाव हददीतील ग्राम पांगराबंदी येथे वरली मटका धंदयावर रेड करुन ४८१० रुपयाचा मुददेमाल जप्त केला. मालेगाव हददीतील ग्राम पिंगळवाडी येथे वरली मटका धंदयावर रेड करुन २,६६,५१० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पो.स्टे. मंगरुळपीर हददीतील ग्राम मानोली येथे अवैधरित्या वरली मटका खेळणार्या लोकाविरुध्द कारवाई करुन १६,७५० रुपयाचा मुददेमाल व २१ जानेवारी रोजी पोहरादेवी येथे अवैधरित्या जुगार खेळणार्या लोकांविरुध्द कारवाई करत ३२२५० रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एस. एम. जाधव यांचे पथकातील सपोनि अतुल मोहनकर, पोउपनि शब्बीर पठाण, पोहेकॉ किशोर चिंचोळकर, सुनिल पवार, गजानन अवगळे, दिपक सोनवने, पोना मुकेश भगत, राजेश राठोड, अमोल इंगोले, अश्विन जाधव, राजेश गिरी, प्रशांत राजगुरु, पोशि संतोष शेनकुटे, डिगावर मोरे यांनी केली. यासोबतच कोणालाही अवैध धंदयाबाबतची माहिती असल्यास त्यांनी पोलीस स्टेशन किंवा स्थानीक गुन्हे शाखेतील अधिकारी याना प्रत्यक्ष भेटुन अथवा फोनव्दारे माहिती दयावी. माहिती देणार्याबाबत पुर्णपणे गोपनीयता ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.