Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम : भाजपा सरचिटणीस कु. भावनाताई पंजाबराव सरनाईक यांच्या पुढाकारातुन कडाक्याच्या थंडीत गरजुंना ब्लँकेटचे वितरण

वाशिम - थंडीच्या वाढत्या लाटेचा एकीकडे फुटपाथवरील निर्धन, गरीब लोकांना अतोनात त्रास होत आहे तर दुसरीकडे पक्ष, संघटना व सामाजीक कार्यकर्ते मानवतेचे व्रत अंगीकारुन गोरगरीब व गरजुंना ब्लँकेट वाटप करुन त्यांना दिलासा देत आहेत. भुतदयेच्या या उपक्रमामध्ये भाजपा महिला मोर्चाच्या शहर सरचिटणीस कु. भावनाताई पंजाबराव सरनाईक यांच्या पुढाकारातुन मकरसंक्रांतीचे औचित्य साधून स्थानिक श्री बालासाहेब मंदिर व श्री शनिमंदिरासमोर बसणार्‍या गरजुंना शनिवार, १५ जानेवारी रोजी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कडाक्याच्या थंडीत अचानक मिळालेल्या या भेटीमुळे गोरगरीबांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले होते. यावेळी भावना सरनाईक, नगरसेवक संतोष उर्फ बाळु मुरकुटे, भाजपा उपशहराध्यक्ष राम ठेंगडे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. रुपाली देशमुख, शहर सरचिटणीस छाया मडके, शहर सरचिटणीस छाया पवार, विशाल परळकर, राजु कलवार आदींच्या हस्ते गरजुंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.