Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम : निमजगा येथील मोफत भव्य आरोग्य शिबीर व लसीकरणाचा शेकडोंनी घेतला लाभ : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीचे औचित्य : जिल्हा नियोजन समिती सदस्य व शिवसैनिक नितीन मडके यांचे आयोजन


वाशिम -
शिवसेना पक्षप्रमुख तथा हिंदुह्दयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समिती सदस्य नितीन मडके यांच्या आयोजनातून स्थानिक निमजगा येथील संत ज्ञानेश्वर नगरात 22 जानेवारी रोजी आयोजित मोफत भव्य आरोग्य शिबीर, रक्तदान, नेत्रतपासणी व लसीकरण शिबीराचा परिसरातील शेकडो नागरीकांनी लाभ घेतला. 23 जानेवारी रोजीही शिबीर होणार असून या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन नितीन मडके यांनी केले आहे. 

शिबिराचा प्रारंभ शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पुजनाने झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 25 युवकांनी पुढे येवून उस्फुर्तपणे रक्तदान केले. रक्त संकलनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी व तंत्रज्ञांनी सहकार्य केले. शिबीरामध्ये डॉ. मनिष पावसे यांनी आलेल्या महिला, पुरुष व बालकांची नेत्रतपासणी केली. तर डॉ. सागर जाधव, डॉ. स्नेहा जाधव, डॉ. जीवन नायक, डॉ. विनोद निरगुडे यांनी ताप, सर्दी, खोकला आदी रुग्णांची तपासणी करुन त्यांना मोफत औषधे व गोळ्या दिल्या. यावेळी आयोजीत लसीकरण शिबीरात 37 जणांनी कोव्हॅक्सीन व 18 जणांनी कोविशिल्ड लस घेवून स्वत:ला कोरोना आजारापासून सुरक्षीत करुन घेतले. लसीकरणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नर्सेसनी अथक परिश्रम घेतले. तर रुग्णांच्या तपासणीसाठी सेवार्थ चॅरीटेबल ट्रस्ट व सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजच्या टिमने विशेष सहकार्य केले. नितीन मडके यांच्यावतीने शिबीरात सहभागी सर्व डॉक्टर्स आणि नर्सेसचा सत्कार करण्यात आला. शिबीराच्या आयोजनासाठी नितीन मडके, छोटु पट्टेबहादूर, रतन जहिरव, शामा इंगोले, प्रकाश वानखेडे, दत्ता इंगोले, नाना इंगोले, गणेश इंगळे, सुनिल वानखेडे, विठ्ठल इंगोले, अनिकेत ढगे, विशाल मडके, शेख शकील, शुभम भडके, गोपाल इंगळे, रवि इंगळे, संतोष राऊत, प्रदीप इंगळे, हनुमान इंगळे, आकाश मडके, सचिन मडके, ऋषीकेश जोगदंड यांच्यासह नितीन मडके मित्रमंडळाने अथक परिश्रम घेतले. कोरोनाचे सर्व नियम पाळून शिबीर पार पाडण्यात आले.