वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य निबंध स्पर्धा : रोख बक्षीसांची लयलुट : बौध्द युवा मंचचे आयोजन : विद्यार्थ्यांनी भाग घेण्याचे अध्यक्ष विशाल राऊत यांचे आवाहन
वाशिम - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौध्द युवा मंचच्या
वतीने विद्यार्थ्यांसाठी भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अ गटामध्ये वर्ग ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘डॉ. बाबासाहेब
आंबेडकर व त्यांचे कार्य’ या विषयावर, ब गटामध्ये वर्ग ५ ते ८ वीच्या
विद्यार्थ्यांकरिता ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व त्यांचे कार्य’
या विषयावर किमान ५०० शब्दाच्या वर निबंध लिहीता येतील. गट अ स्पर्धेत
प्रथम बक्षीस २१०० रुपये व प्रमाणपत्र, व्दितीय बक्षीस ११०० रुपये व
प्रमाणपत्र, गट ब स्पर्धेत प्रथम बक्षीस ११०० रुपये व प्रमाणपत्र, व्दितीय
बक्षीस ५०१ रुपये व प्रमाणपत्र असे ठेवण्यात आले आहे. तज्ञ शिक्षकांच्या
हस्ते विद्यार्थ्याच्या निबंधाचे निरिक्षण करुन उत्कृष्ट निबंध लिहीणार्या
विजेत्या विद्याथ्यार्र्ंची नावे घोषीत त्यांना बक्षीसे देण्यात येतील.
तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी
स्वहस्ताक्षरात घरीच निबंध लिहून येत्या १० डिसेंबरपर्यत आदित्य
कॉम्प्युटर, विठ्ठलवाडीजवळ, श्रध्दा कॉम्प्युटर, बालाजी कॉम्प्लेक्स, सहारा
प्रिंटर्स, महात्मा फुले संकुल, वाशिम जमा करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या
अधिक माहितीकरीता विद्यार्थ्यांनी ७०२०९४५८७०, ९०२१५३७३४१ या क्रमांकावर
संपर्क साधावा व जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन बौध्द
युवा मंचचे अध्यक्ष विशाल राऊत यांनी केले आहे.