वेतन पुनरर्चना करुन आत्महत्या थांबविण्याची मनसेची मागणी
वाशिम - महाराष्ट्राची जीवनवाहीनी असलेली व लालपरी म्हणून गौरवान्वित एस.टी. च्या प्रवासातून हजारो लाखो प्रवाशांना सुरक्षीरित्या त्यांच्या इच्छीत स्थळापर्यत पोहचविणार्या कर्मचार्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून अल्पशे वेतन अणि भत्त्यामुळे एसटी कर्मचारी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. एसटी ही महाराष्ट्राचा आर्थिक विकास आणि दळणवळणाचे महत्वाचे माध्यम असून अतिशय खराब रस्त्यावर सुध्दा कर्मचारी एसटीची देखभाल आणि सेवा आपला जीव धोक्यात घालुन बजावत आहेत. त्यामुळे या कर्मचार्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेवून त्यांना राज्य कर्मचार्यांचा दर्जा द्यावा आणी त्यांच्या वेतनाची पुनर्रचना करुन त्यांचा संप मिटविण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. त्यासोबतच एसटी कर्मचार्यांच्या सुरु असलेल्या संपला मनसेने आपला संपुर्ण पाठींबा दिला आहे. याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यंाच्या नेतृत्वात ३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत परिवहन मंत्री आणि कामगार कल्याण मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देतांना महाराष्ट्र सैनिक गजानन वैरागडे, संतोष पहोकार, सतिष कडवे, सचिन जकलवार, कृष्णा इंगळे, दिपक कोंघे, नितीन राऊत, विनोद सावके, सुरेश नेहुल, संतोष गावंडे, चेतन जाधव आदी उपस्थित होते.