वाशिम दि. 30 (जिमाका) : जिल्हयात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बाहेर गावावरुन कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस किंवा एक लस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक आहे. कार्यालयामध्ये विना मास्क प्रवेश करता येणार नाही. मास्क नसेल तर दंड आकारण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयात यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना नागरीकांनी दोन्ही लसीकरणाचे डोस किंवा एक डोस घेतल्याबाबत प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.