रिपाइं आठवले संपकरी एस.टी. कामगारांच्या पाठीशी : तेजराव वानखडे
सर्वसामान्यांप्रमाणे एस.टी. कामगारांचेही महाविकास आघाडी सरकार शोषक वृत्तीने शोषण करीत आहे. आपल्या मागण्यांसाठी दाद मागणार्या एस.टी. कामगारांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. तुटपुंज्या पगारावर गेली कित्येक वर्षे एस.टी. कामगार बांधव काम करीत आहेत. पंरतू आजतायगायत कुठल्याही सरकारला यांच्याविषयी मायेचा पाझर फुटला नाही. पगार वाढ आणि वाढीव भत्यासाठी आंदोलनाचे अस्त्र उगारणार्या आंदोलकाची भूमिका चुकीची नाही, सोबतच पदोन्नतीत आरक्षण, शेतकर्यांचे प्रश्न, दलितांवर अत्याचार, कलावंताचे प्रस्तावित प्रलंबीत प्रस्ताव याविषयी तेजराव वानखडे यांनी सरकारच्या कार्यशैलीबद्दल रोष व्यक्त केला
एस.टी. कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता देण्यासह जोपर्यंत एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही. तोपर्यंतच्या लढ्यात रिपाइं आठवले आंदोलकांसोबत असल्याचे आश्वासन या निमित्ताने तेजराव वानखडे यांनी आंदोलकांना दिले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत राज्यातील तब्बल 34 एस.टी. कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशात सरकारने एस.टी. कामगारांबद्दल सहानुभूती दाखवत त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व एस.टी. कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी कामगारांना पाठींबा जाहीर करताना केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, साहीत्यीक महेंद्र ताजणे, जगदीशभाई इंगळे, दत्तराव वानखेडे, अरविंद उचित, प्रकाश गवई, अनंत कांबळे, उल्हास इंगोले, हिरामण साबळे, रामदास भगत, तुकाम खडसे सत्यवादी, माणिकराव जामणीक, डॉ. रमेश वानखडे, युवा महासचिव कवि राठोड, रवि राठोड, युवा तालुका अध्यक्ष नाना तायडे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते