Ticker

6/recent/ticker-posts

11 वीच्या विद्यार्थ्यांचे श्रेष्ठ योजनेकरीता 4 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

वाशिम दि.29 (जिमाका) केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व समक्षिकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जातीच्या इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांचे श्रेष्ठ (SHRESHTA) या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहे. SHRESHTA या योजनेनुसार विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न हे 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असावे. या योजनेअंतर्गत शिक्षण व राहण्याची सोईकरीता शाळेनुसार प्रत्येक विद्यार्थी मागे रु. 1 लाख 25 हजार रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. SHRESHTA या योजनेअंतर्गत खाजगी निवासी नामांकित शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेकरीता अर्ज या https://washim.gov.in येथून प्राप्त करता येईल.अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वाशिम या कार्यालयात किंवा ईमेल acswowashim@gmail.com या ई-मेलवर सादर करण्याची अंतिम तारीख 4 डिसेंबर 2021 आहे. या योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.असे आवाहन नोडल अधिकारी तथा समाज कल्याणचे सहायक आयुक्त एम.जी.वाठ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी https://grants-msje.gov.in/scguidelines. या संकेतस्थळाला भेट दयावी.