असंघटीत कामगारांनी नागरी सुविधा केंद्रामार्फत
31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी अभियान
वाशिम, दि. 22 (जिमाका) : असंघटीत कामगारांसाठी केंद्र शासनाने सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने 31 डिसेंबर 2008 रोजी असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 पारीत केला आहे. बिडी कामगार, मच्छिमार, सुतार कामगार, सेरीकल्चर कामगार, भाजी आणि फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार, यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. 26 ऑगस्ट 2021 पासून असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टलचे उदघाटन करण्यात आले आहे.
वाशिम जिल्हयाअंतर्गत मुख्य बाजार, गांव, शहर/ तालुका स्तरावरील बाजारपेठ येथे नागरीक सुविधा केंद्र (CSC) आणि सरकारी कामगार अधिकारी यांच्या संयुक्तवतीने 15 ऑक्टोबर 31 ऑक्टोबर 2021 या दरम्यान नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.
तरी जिल्हयातील सर्व असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी नजिकच्या नागरी सुविधा केंद्र येथे नोंदणी करावी. काही अडचणी निर्माण झाल्यास कार्यालयाच्या 9881166472/7972434490 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी केले आहे.