Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम : राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार : 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागवीले

वाशिम, दि. 12 (जिमाका) : सन 2003-04 या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 10 वी व इयत्ता 12 च्या परीक्षेत विशेष उल्लेखनिय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामधून इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांस पाच हजार रुपये रोख परितोषिक, स्मृतिचिनह व प्रमाणपत्र देण्यात येते. सन 2020-21 या शैक्षणिक सत्राचा जिल्हयातील इयत्ता 10 वी व 12 वी चा निकाल घोषीत झाला आहे. या योजनेचे प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांकडून सहायक आयुक्त, समाज कल्याण वाशिम या कार्यालयात सादर करण्यात यावे. जिल्हयातील सर्व संबंधित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी सन 2020-21 या वर्षाकरीता राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार परिपुर्ण प्रस्ताव इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात यावे. प्रस्तावासोबत विद्यार्थ्यांचे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत, विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापक यांचे खाते पुस्तकांची झेरॉक्स व विद्यार्थ्यांचे खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिफारशीसह सादर करावे. हे प्रस्ताव 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण वाशिम या कार्यालायस सादर करावे. जेणेकरुन सदरील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेचा लाभ देण्याबाबतची कार्यवाही करता येईल. वरील कालावधीत प्रस्ताव प्राप्त न झाल्यास विद्यार्थी सदर योजनेपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकांची/प्राचार्यांची राहील. यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त एम.जी. वाठ यांनी कळविले आहे.