
वाशिम, दि. 13 (जिमाका) : प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम 3.0 अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील Customised Crash Course Programme for COVID Warriors कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम 3.0 अंतर्गत आरोग्य अभियानांतर्गत Customised Crash Course Programme for COVID Warriors राबविण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील या योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील लिंक फॉर्ममध्ये आपली माहिती 22 ऑक्टोबर 2021 पूर्वी भरावी. https://forms.gle/w2CGUAiVAFsMEs189 अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम येथील दूरध्वनी क्रमांक 07252-231494 व ई-मेल आयडीवर washimrojgar@gmail.com संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त, सुनंदा बजाज यांनी केले आहे.