Ticker

6/recent/ticker-posts

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


वाशिम, दि. ०८ (जिमाका) :
केंद्र शासनाने सन २०२०-२१ या वर्षापासून पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी या नविन योजनेस मंजूरी दिली आहे. या योजनेअंतर्गत दुध प्रक्रीया, आईस्क्रीम, चीज निर्मित्ती, दुध पाश्चरायजेशन, दुध पावडर इ. मास निर्मित्ती व प्रक्रीया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटिण, खनिज मिश्रण, मुरघास निर्मित्ती पशुपक्षी खाद्य, विश्लेशन प्रयोग शाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. व्याज दरामध्ये ३ टक्के सुट देण्यात येणार आहे. योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना केंद्र शासनाच्या पशुपालन व डेरी विभागाच्या संकेतस्थळावर http://dahd.nic.in/ahdf उपलब्ध आहेत. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर या योजनेच्या मार्गदर्शक सुचना मराठीत प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
    सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलव्दारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. केंद्र शासनाने वर नमुद उद्योग व्यवसायासोबत लिंग विनिश्चित वीर्य मात्रा निर्मिती, बाह्य फलक केंद्र पशुधनाच्या शुध्द वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन या बाबींचा समावेश केला आहे. सदर योजनेचा व्यक्तीगत व्यावसायीक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापण झालेल्या कंपणी यांना लाभ घेता येईल. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी, संस्थांनी संबंधित पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन विभागाच्या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.