वाशिम, दि. ३१ (जिमाका) : जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा कोविड रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे पैशाची मागणी केल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेवून सदर कंत्राटी कर्मचाऱ्याला तातडीने कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.
जिल्हा कोविड रुग्णालयात कंत्राटी तत्वावर नियुक्त एका कर्मचाऱ्याने कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेह पीपीई कीटमध्ये बांधण्यासाठी सदर मृत व्यक्तीच्या नातेवाईकाकडे पैशाची मागणी केल्याची तक्रारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांच्याकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला तातडीने सेवेतून मुक्त केले असल्याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत देण्यात आली आहे.