कारंजा (लाड) - शहरातील विविध रस्त्यांच्या मागणीसाठी पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या वतीने कारंजा नगर परिषदेला दिलेल्या निवेदनाची काँग्रेस नेते मो. युसुफ पुंजाणी यांनी तात्काळ दखल घेवून बैठकीच्या माध्यमातून दळणवळणाच्या सुविधेसाठी नागरीकांना रस्ते उपलब्ध करुन देण्याचे निर्देश न.प. प्रशासनाला दिले आहेत. यानुसार नगर परिषदेकडून रस्त्याचे मोजमाप आणि अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख विलास राऊत यांनी दिली.
निवेदनात नमूद केले होते की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या सौंदर्यीकरण्याचे बांधकाम विभाग नगर परिषदेमार्फत पूर्ण करण्यात आले आहे. परंतु नागरीकांच्या अविरत मागणीनंतरही या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अद्यापपर्यत बसविण्यात आला नाही. तसेच विकास आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या के.एन. कॉलेज - भिमनगर - वंडर किड्स स्कूल - मातोश्री रमाबाई आंबेडकर कॉलनी - गौतमनगर - शांतीनगर - लक्ष्मीनगर - ताजनगर - गांधीनगर - भारत नगर - कपिलावस्तु नगर ते नागपूर - औरंगाबाद जलदगती हायवेपर्यंत रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित करून निधी उपलब्ध करून द्यावा. गौतमनगर, शांतीनगर लागून असलेल्या कारंजा नगरपरिषद हद्दीतील ताजनगर, लक्ष्मीनगर, गांधीनगर, भारतनगर, कपिलवास्तु नगर, कृष्णा कॉलनी या परिसरातील नागरीकांची होणारी असुविधा लक्षात घेवून या ठिकाणचे अंतर्गत रस्ते व नाल्या बांधकामाचे सविस्तर अंदाजपत्रक बनवून बांधकाम करावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या होत्या. यासंदर्भातील निवेदन काँग्रेस नेते युसुफ पुंजाणी आणि न.प. प्रशासनाला देण्यात आले होते. पंुंजाणी यांनी दिलेल्या निर्देशानुसार न.प. प्रशासनाने या मागण्यांची दखल घेवून निवेदनात नमूद सर्व रस्त्यांच्या कामाचे मोजमाप करून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहेत. मोजमाप करतांना नगरसेवक तथा गटनेते अॅड. फिरोज शेकुवाले, पिरीपाचे कारंजा, मानोरा, मंगरूळपीर विभागीय अध्यक्ष तथा वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख विलास राऊत तसेच विजय गागरे, चांदभाई मुन्नीवाले, हंसराज शेंडे, तोताराम राठोड, गजानन बोरकर, दिनेश आगाशे, गोपाल सोनुलकर, प्रल्हाद शहाकार ,उमेश शितोळे, विनायक पद्मगीरवार, साहेबराव राऊत, कन्हैय्या ठाकूर, शेषराव ढाकूलकर, मुरलीधर ताथोड, गजानन बोरेकर, गणेश गडकर, अक्षय बोळे, धम्मामाला रामटेके, अर्चना रोठे, अरुण घर्डिनकर, विवेक पवार आदीसह कार्यकर्ते, नागरिक, महिला बहुसंख्येने उपस्थित होते. निवेदनाची तात्काळ दखल घेतल्याबद्दल नागरीकांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते युसुफ पुंजाणी, पिरीपाचे जिल्हा संपर्क प्रमुख विलास राऊत व नगर परिषदेचे आभार मानले आहेत.