वाशिम - कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमध्ये महावितरणने सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा विज बिले दिली आहेत. त्यामुळे आधीच रोजगार हिरावून घेतल्यानंतर फुगुन आलेल्या विजबिलामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सामान्य जनता हवालदील झाले आहेत. महावितरणच्या या अन्यायाविरुध्द रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया गप्प बसणार नाही. शासनाने विजबिल माफीचा निर्णय लवकरात लवकर न घेतल्यास संविधानात्मक पध्दतीने गोंधळ जागरण आंदोलन करुन सुस्त झालेल्या शासनाला जागे करण्यात येईल असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी दिला आहे.
विजबिल माफीसाठी पक्षाच्या वतीने गेल्या 29 जुलै रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु या निवेदनावर शासनाकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. कोरोना महामारीत लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांची विद्युत देयके त्वरीत माफ करण्याची तातडीची गरज आहे. गत 24 मार्चपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. तेव्हापासून गोरगरीब व सामान्य नागरीकांना प्रचंड आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरे ओस पडली आहेत. कोणताही कामधंदा नाही. व्यापार बरोबर होत नाही. लघुउद्योजकांसोबत सामान्य व्यापारी, गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय नागरीकांना प्रचंड आर्थिक अडचण होत आहे. 1 एप्रिलपासून सरकारने विजदरात वाढ केली आहे. 0 ते 100 च्या स्लॅबमध्ये सुध्दा वाढ करीत राज्यातील जनतेवर अन्याय केला आहे. त्यातच मिटर रिडींग न करता अव्वाच्या सव्वा विद्युत देयके पाठवून महावितरणने गोरगरीबांना विजेचा शॉक दिला आहे. यासोबतच जिल्हयातील अनेक जणांना मिटर फॉल्टी बिल आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर महावितरणकडून घोर अन्याय केला जात आहे. सदरहु अव्वाच्या सव्वा आलेली अशी विज बिले दुरुस्ती करुन देण्यासाठी महावितरणने विशेष कक्ष सुरु करावा. तसेच लॉकडाऊन काळातील विद्युत देयके माफ करावी अशी मागणी रिपाइंच्या वतीने सातत्याने सरकारला करण्यात येत आहे. त्यामुळे या संकटकाळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी विद्युत देयके त्वरीत माफ करावी अन्यथा नाईलाजास्तव पक्षाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा तेजराव वानखडे यांनी दिला होता. तरी सर्वसामान्यांची होणारी होरपळ लक्षात घेता जिल्हयातील सर्वसामान्य नागरीकांची लॉकडाऊन काळातील विज बिले त्वरीत माफ करुन त्यांना दिलासा द्यावा. अन्यथा रिपाइंच्या वतीने संविधानात्मक पध्दतीने गोंधळ जागरण आंदोलन करुन सुस्त झालेल्या शासनाला जागे करण्यात येईल असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी दिला आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ