Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम : सहयोग फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाकाळात सेवा देणार्‍या आशासेविकांचा कृतज्ञता सत्कार


वाशीम - कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झालेल्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता नागरीकांना अत्यावश्यक आरोग्यसेवा देणार्‍या आशासेविकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २३ जुलै रोजी सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या सहयोग फाऊंडेशनच्या वतीने नगर परिषदेच्या नागरी आरोग्यवर्धिनी केद्रात कार्यरत आशासेविकांचा सत्कार करण्यात आला.
  कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. यामध्ये आशासेविकांनी सुद्धा देशाप्रती कर्तव्यभावनेने स्वतःचा जीव धोक्यात घालून शहरात घरोघरी जाऊन कोरोना विषाणूची नागरिकांची तपासणी करुन नागरीकांना आरोग्यसेवा दिली आहे. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता इंगोले, सचिव रुपाली देशमुख, महीला पतंजलीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षा दीपा वानखडे, कोषाध्यक्षा सोनाली गर्जे आदींनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता भगत, आशा गट प्रर्वतक अध्यक्षा संगीता काळबांडे व त्यांच्या सर्व सहकारी आशा सेविकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. हा सत्काराचा कार्यक्रम सामाजीक अंतर व मास्क लावून पार पाडण्यात आला.