वाशीम - बियाणे विक्रेत्यांनी बोगस बियाणे शेतकर्यांना विकल्यामुळे हे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे जिल्हयातील शेतकर्यांवर दुबार व तिबार पेरणी करण्याची वेळ आली असून यामुळे शेतकर्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या बाबीला संबंधीत कृषी सेवा केंद्र कारणीभूत असून या बियाणे विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह संबंधीत कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्याची मागणी शिवसंग्राम पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी १० जुलै रोजी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोळे यांच्या मार्गदर्शनात व पदाधिकारी गजानन इढोळे यांच्या पुढाकारात अनेक शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, पेरणीसाठी शेतकर्यांनी कृषी सेवा केंद्राकडून विकत घेतलेले बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकर्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट उभे झाले आहे. या प्रकाराला बोगस बियाणे विकणारे कृषी सेवा केंद्र संचालकच कारणीभुत असून त्यांच्यावर शेतकर्यांना फसविल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे. बोगस बियाणे विकल्यानंतर जिल्हयातील कृषी सेवा संचालकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे ज्या तत्परतनेे कृषी सेवा केंद्र संचालक शेतकर्यांना बोगस बियाणे विकतात त्याच तत्परतेने हे विक्रेते बोगस बियाणे पुरवठा करणार्या कंपन्यांविरुध्द सरकारला का निवेदने देत नाहीत? महाराष्ट्राचा पोशिंदा व अन्नदात्या शेतकर्यांशी अशा प्रकारे केलेल्या फसवणूकीचा शिवसंग्रामच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून शासनाने या प्रकाराची त्वरीत चौकशी करुन संबंधीत बियाणे विक्रेत्यांचे परवाने रद्द करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोळे, प्रदीप कुटे, राजेश कव्हर, भरत पोधाडे, अमोल नवघरे, अनिल खानझोडे, माणिक गालट, किशोर नाईक, सुधाकर धोंगडे, रविकुमार देव्हडे, शुभम शिंदे, आकाश शिंदे, विवेक देशमुख, राजकीरण पवार, ऋषीकेश कुटे, गणेश गिद, आकाश गुप्ता, महादेव जाधव, गोपाल जाधव, आकाश गरकळ, शुभम नवघरे, कृष्णा वानखेडे, गजानन वानखेडे, फिरोज शाह, समीर शेख, प्रदीप बकाल आदी शेतकर्यांच्या सह्या आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ