वाशीम - अल्टरनेटीव्ह मेडीसीन आणि इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडीसीन मधील पदवीधारकांना पदवीधर मतदार संघामध्ये नोंदणी करण्याची सुविधा देवून त्यांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी केली आहे. यासंदर्भात ९ जुलै रोजी असोसिएशनच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग यांच्यासह विधान परिषद आमदार डॉ. रणजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या हालचाली निवडणूक आयोगाकडून सुरु झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये अल्टरनेटीव्ह मेडीसीन आणि इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडीसीन मधील पदवीधारक मतदार अद्याप वंचित आहेत. त्यामुळे अल्टरनेटीव्ह मेडीसीन आणि इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडीसीन मधील पदवीधारक मतदारांना पदवीधर मतदार संघामध्ये नोंदणी करण्याची सुविधा देवून त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. जेणेकरुन हे पदवीधर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतील अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ