वाशिम, २४ जुलै : मुख्याध्यापक पदाचा प्रभार काढल्याचा राग मनात ठेवून एका शिक्षकाने जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाच्या हत्येची सुपारी देवून एका युवकाकरवी त्याची हत्या करण्याचा प्रयत्न फसला. या हल्ल्यात मुख्याध्यापक बालबाल बचावले असून हल्लेखोर युवक आणि या कटातील मुख्य सुत्रधार शिक्षकाला पोलीसांनी ताब्यात घेतले. ही घटना २४ जुलै रोजी सकाळी मालेगाव तालुक्यातील अमानी येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. या घटनेमुळे जिल्हयाच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून केवळ प्रभार काढल्याचा राग मनात ठेवून ज्ञानाजर्नाचे पवित्र कार्य करणार्या एका शिक्षकाकडूनच असे गुन्हेगारी कृत्य केेेेेेेेेेेेेेेेेल्या गेल्यामुळे शिक्षण क्षेत्राचे गुन्हेगारीकरण तर होत नाही ना अशी भिती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
या घटनेची माहिती अशी की, मालेगांव तालुक्यातील अमाणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली आहे. २४ जुलैच्या सकाळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी ५ - ६ शिक्षकांची बैठक बोलावली होती. शाळेच्या कार्यालयात ही बैठक सुरू असताना अचानक एक तरुण तिथे पोहोचला. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या दिशेनं त्याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. सुदैवाने देव बलवत्तर असल्यामुळे मुख्याध्यापकांना गोळी लागली नाही. या घटनेत इतर कुणीही जखमी झालं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमाणी येथील २२ वर्षीय सुशांत खंडारे हा युवक स्थानिक जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे. याला शाळेत शिकत असल्याचा निर्गम उतारा पाहिजे असल्याने त्याने तसा अर्जही दिला होता, मात्र, उशीर होत असल्याचं कारण पुढे करत आज मुख्याध्यापक विजय बोरकर आणि शाळेतील इतर ५ - ६ शिक्षक कार्यालयात असतांना सुशांत खंडारे हा शाळेच्या कार्यालयात थेट दाखल झाला त्यानंतर त्याने हातामधील कट्टा शिक्षकांकडे फिरवित धमकावले आणि त्यातील गोळी झाडली. पण, सुदैवाने ती गोळी कपाटावर लागली. या गोळीबारामुळे शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला.त्यानंतर तो विद्यार्थी तो कट्टा तिथेच टाकून पळून गेला.
त्यानतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले, कर्मचारी गजानन काळे, सुधीर सोळंके आणि इतरांनी या युवकाला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणले. ज्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असा एखादा विद्यार्थी केवळ निर्गम उतारा मिळण्यास उशीर होत असल्याच्या कारणासाठी गोळीबार करणार नाही, हे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,सहाय्यक पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.पवनकुमार बन्सोड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सखोल चौकशी केल्यावर धक्कादायक वास्तव समजले. त्याच शाळेत कार्यरत असलेले गजानन इंगळे यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापकाचा प्रभार होता. मात्र, त्यांच्याकडील हा प्रभार काढून विजय बोरकर या शिक्षकाकडे देण्यात आल्यानं गजानन इंगळे यांच्या मनात द्वेष भावना तयार झाली होती. त्यामुळे या शिक्षकाने सुशांत खंडारे या युवकाच्या डोक्यात भरवले आणि कट्टा खरेदीसाठी ४० हजार रुपये दिले. त्यांनतर याने एक कट्टा खरेदी केला. तसंच एक दिखाऊ पिस्टल ही ऑनलाइन खरेदी केली होती. आज या कट्टयामधून सुशांत खंडारे याने शाळेत जाऊन शिक्षकांना धमकावत गोळी झाडली. या घटनेनंतर आरोपी युवक आणि शिक्षक गजानन इंगळे या दोघांना ताब्यात घेतले असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ पवनकुमार बन्सोड यांच्या मार्गदर्शनात मालेगांव चे ठाणेदार आधारसिंग सोनोने सखोल तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्याध्यापकावरील या हल्ल्यामुळे जिल्हयातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणार्या एका मुख्याध्यापकावर झालेल्या हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध व संताप व्यक्त होत आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ