Ticker

6/recent/ticker-posts

सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यातील दुकाने सुरु ठेवण्यास मुभा : शाळा, धार्मिक स्थळे बंद राहणार


वाशिम, दि. ०९ (जिमाका) : जिल्ह्यात लॉकडाऊनची नवीन नियमावली १ जुलै पासून लागू करण्यात आली होती. यामध्ये अंशतः बदल करून यापूर्वी परवानगी देण्यात आलेली सर्व दुकाने, आस्थापना ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केले आहेत.
सर्व आस्थापना, दुकानाच्या मालकांनी, खरेदीसाठी जाणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या आस्थापना, दुकानांवर गर्दी दिसून येईल, अशा आस्थापना, दुकाने बंद तत्काळ करण्यात येतील. मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
 लॉकडाऊनची नवीन नियमावली १ जुलैपासून जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. तसेच धार्मिक स्थळांमध्ये भाविकांना प्रवेश राहणार नाही. ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद राहतील, याची खात्री संबधित शाळेच्या प्रशासनाने करावी, तसेच पालकांनी सुद्धा याची नोंद घ्यावी.