मुंबई दि. २४ :- करोना साठी वापर होणारी औषधांची मागणी व उपलब्धता यातील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या अन्न व औषध प्रशासनास मिळत आहेत व अशी बातमी प्राप्त होताच अधिकारी या बाबत सखोल शोध घेऊन, बनावट ग्राहक द्वारे सापळा रचून रॅकेट शोधून काढण्याचा प्रयत्त्न करीत आहेत.
अशीच माहिती दि २३. ०७ . २०२० रोजी प्रशासनाच्या ठाणे कार्यालयास मिळाली की उलहासनगर ३ मध्ये एक महिला अक्टरमा ४०० या औषधाची छापील किमंती पेक्षा जास्त दराने विक्री करीत आहे. प्रशासनाच्या अधिकारींनी गुन्हा अन्वेषण युनिट ३, कलयाण पोलिसा समवेत सापळा रचून श्रीमती निता पंजवानी रा. उलाहसनगर. ३, हिला सिपला कंपनी चे टोलसीझुमब अक्टरमा ४००, इंजे. ज्याची छापील किंमत रु ४०,५४५ आहे, सदर इंजेक्शन रु ६० हजार ला विना औषध चिठी , विना परवाना विक्री करताना रंगेहाथ पकडले. सदर महिलेने औषध विक्री करते रुग्णांचा कोविड अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन याची मागणी अथवा पडताळणी केली नाही. या प्रकरणी श्रीमती पाष्टे औषध निरीक्षक यांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे १९४० व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत उल्हासनगर पोलीस ठाणे मधेय गुन्हा नोंदविला असून पुढील तपास चालू आहे।
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकरी अशा काळाबाजार करणारे विक्रेते वर नजर ठेवून आहेत व आता पर्यंत एकूण ४ कारवाया करून १५ लोकांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई डॉक्टर राजेंद्र शिंगणे, मंत्री अन्न व औषध प्रशासन, राजेंद्र यड्रावकर, राज्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन यांनी अशा औषधांचा काळाबाजार व वाजवी किमतीत विक्री यावर नियंत्रण ठेवण्याच्या दिलेल्या सूचनां च्या अनुषंगाने अरूण उन्हाळे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन, श्री सुनील भारद्वाज सहआयुक्त दक्षता, श्री पवनीकर सह आयुक्त कोंकण विभाग,सहाय्यक आयुक्त श्री प्रवीण पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासनाच्या कोंकण विभागाचे औषध निरीक्षक व गुन्हे अन्वेषण युनिट ३ कलयाण शाखा यांनी संयुक्तपणे केली।
रुग्णास औषधे छापील दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास व औषधाचा काळा बाजार होत असल्यास या बाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ / ०२२- २६५९२३६२ या वर संपर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ