वाशीम - कोरोना या घातक आजारापासून कामगारांचे संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंंद्र वाशीमच्या वतीने कामगारांसह एसटी परिवहन विभागातील कर्मचारी आणि वाशीम अर्बन बँकेतील कर्मचार्यांना मास्कचे वितरण करण्यात आले. अकोला विभागीय कामगार कल्याण केंद्राचे सहाय्यक कल्याण आयुक्त श्रीकांत धोत्रे, अकोला गट कार्यालयाचे कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर आळणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक देवानंद दाभाडे यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत बसस्थानक कार्यालयात आगार व्यवस्थापक विनोद इलामे, वाहतुक नियंत्रक तेलगोटे, कर्मचारी शाम गावंडे, देवानंद राजगुरु, मडके, मनोज दाभाडे, राजु कोंडाणे आदींच्या हस्ते एसटी कर्मचार्यांना मास्कचे वितरण करण्यात आले. यासोबतच स्थानिक वाशीम अर्बन बँकेमधील कर्मचार्यांना अधिकारी लांभाडे यांच्या हस्ते मास्कचे वितरण करण्यात आले. तसेच स्थानिक पुसद नाका येथील सरकारी कामगार कार्यालय येथे अधिकारी योगेश गोटे, कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक देवानंद दाभाडे, कर्मचारी गजानन आरु, सौ. मालती दाभाडे, सौ. अंबिका कठाडे, श्रीमती मंगला नवरे, प्रमिला ढोके, सामाजीक कार्यकर्ते सुखदेव राजगुरु यांच्या हस्ते इमारत बांधकाम कामगारांना मास्कचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम साथरोग कायदा व शासनाच्या निर्देशाचे पालन करुन पार पाडण्यात आला.