Ticker

6/recent/ticker-posts

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कुंभी येथील शेतकर्‍यांशी साधला ऑनलाईन संवाद : कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप : शेतकर्‍यांशी विविध विषयावर चर्चा


वाशीम - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत १ जुलै ते ७ जुलै दरम्यान कृषी विभागाच्या वतीने जिल्हयात राबविलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपानिमित्त ७ जुलै रोजी राज्याचे कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांनी कुंभी येथील शेतकर्‍यांशी बिबीएफ प्लॉटवर आयोजीत शेतीशाळेमध्ये झुम अ‍ॅपव्दारे विविध विषयावर दिलखुलासपणे ऑनलाईन संवाद साधला.
    याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी, तंत्र अधिकारी(जिल्हा) सत्यभान मकासरे, केविके कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे, तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ, कृषी अधिकारी पोकरा मिलींद अरगडे, तालुका कृषी अधिकारी रविंद्र इंगोले, प्रकल्प विशेषज्ञ पोकरा रवी फुगारे, विमा कंपनीचे चैनसर, ताहेरसर आदींसह शेतकर्‍यांनी या संवादात भाग घेतला.



    कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त जिल्हयात विविध उपक्रम व मार्गदर्शन शिबीरे यशस्वीपणे राबविण्यात आली. जिल्ह्यामध्ये पोकरा अंतर्गत १४९ गावे असून त्यातील मंगरुळपीर तालुक्यात २२ गावे येतात. त्यापैकी जिल्ह्यातून मंगरुळपीर तालुक्यातील कुंभी या गावी ७ जुलै रोजी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कुंभी येथील शेतकर्‍यांशी झूम ऑपद्वारे ऑनलाइन संवाद साधला व बीबीएफ प्लॉटवर शेतीशाळेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी कितपत फायद्याचे आहे याबाबत शेतकर्‍यांसोबत संवादातून जाणून घेतले. यावेळी जिअकृअ शंकर तोटावार यांनी शेतीशाळा वर्गात राबविण्यात येत असलेल्या  हवामान अनुकुल तंत्रज्ञान, बिबीएफ तंत्रज्ञान उद्देश व त्याचे फायदे, फेरोमन ट्रॅप, पक्षीथांबे, ५ टक्के निंबोळी अर्क इत्यादी प्रात्याक्षिके दाखवून एकात्मिक किड व्यवस्थापनाचा अवलंब करून किडींचे नियंत्रण करणेविषयी तसेच प्रकल्पामध्ये राबविण्यात येणार्‍या इतर योजनांविषयी शेतकर्‍यांशी चर्चा केली.
    याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अनंतकुमार शेळके, प्रगतशील शेतकरी दिलीप फुके, राजु इंगळे, सरपंच विद्याताई कावरे, पोलीस पाटील देवीदास चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान खोटे, सूर्यभान चौधरी, सुभाष कावरे, पांडुरंग बाविस्कर, भिमराव कावरे, शालीग्राम मनवर, रामराव चौधरी, होस्ट फोर्मर रामराव कावरे, अश्विन शिनगारे, जगदीश भगत, केशव चौधरी, देवेंद्र शेळके, कृषीताई गीताबाई बाविस्कर, ज्योतीताई नागुलकर, शारदा चौधरी, सीमाताई कावरे, उषाताई मनवर, दिलीप व्यवहारे, महादेव शेळके, कृषी पर्यवेक्षक रमेश वानखेडे, कृषी सहाय्यक अविनाश ठोंबरे, शेतीशाळा प्रशिक्षक श्रीनाथ देशमुख, समूह सहाय्यक बुद्धरत्न उंदरे  इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कृषी सहाय्यक डी.एम.पाईकराव यांनी तर देविदास चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम कोरोना संसर्ग संबंधित सर्व नियम पाळून घेण्यात आला.