वाशीम - पावसाळा सुरु होवून एक महिना होत आहे. तसेच वाशीम शहराला पाणीपुरवठा करणार्या एकबुर्जी धरणामध्ये सुध्दा मुबलक पाणीसाठा आहे. पालिका प्रशासन नागरिकांकडून दरवर्षी एका वर्षासाठी दोन हजार रुपये पाणीकर घेऊनही भर पावसाळ्यात वाशम शहरामध्ये पालीका प्रशासनाकडून तब्बल आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. वाशीम पालीकेच्या ‘या’ नियोजनशुन्य कारभाराला वाशीम शहरवासी कंटाळले असून तीव्र असंतोष व्यक्त करीत असल्याचे वृत्त आहे.
वाशीम पालिका प्रशासनाने पुर्वीच्या वर्षभराच्या ८०० रुपये पाणीकरामध्ये तब्बल अडीच पटीने वाढ करुन आता मागील काही वर्षापासून दोन हजार रुपये प्रत्येक नळधारक ग्राहकांकडून पालिका दरवर्षी वसूल करीत आहे. वाशीम शहराला एकबुर्जी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. उन्हाळ्यामध्ये एकबुर्जी धरणात जलसाठा कमी असल्यामुळे शहरामध्ये ८ ते १० दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जातो. परंतु सध्या भर पावसाळ्यात एकबुर्जी धरणामध्ये प्रचंड जलसाठा असूनही पालिका प्रशासनाकडून वाशीम शहराच्या विविध भागात दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यासाठी व शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याने शहरातील नागरिक पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराला वैतागले असल्याची चर्चा आहे.
यासंदर्भात शासनाच्या विविध भागातील नळधारक ग्राहकांनी पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती व नगरसेवकांकडे तोंडी व लेखी तक्रारी दिल्या आहेत. परंतु ‘त्या’ तक्रारीची अद्यापही पालिका प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केल्या जात आहे. वाशीम पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराबाबत व भर पावसाळ्यात शहराच्या विविध भागामध्ये तब्बल १० दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याबाबत जिल्हाधिकारी वाशीम यांनीच आता लक्ष देवून सर्व दोषींवर कारवाई करुन वाशीमकरांना दररोज अथवा दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत करावा अशीही मागणी शहराच्या विविध भागातील वैतागलेल्या नागरिकांनी केली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ