Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम : कोरोना संकटात रिपाइं कार्यकर्त्यांनी कोरोना योध्यासारखे लढावे - तेजराव वानखेडे : रिपाइंच्या मंगरुळपीर तालुका अध्यक्षपदी तुकाराम खडसे यांची निवड


वाशीम - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हा कार्यकारणीची बैठक २२ जुलै रोजी स्थानिक आयुडीपी येथील पक्षाच्या कार्यालयात सामाजीक अंतर पाळून घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे हे होते. तर जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, जेष्ठ साहित्यीक महेंंद्र ताजणे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, संपूर्ण देश कोरोना महामारीच्या संकटात आहे. देशावर कोरोनाचे फार मोठे संकट आहे. अशावेळी रिपाइं आठवलेल्या कार्यकर्त्यांनी या संकटात योध्दयासारखे लढून सामाजीक बांधीलकी ठेवून कार्य करावे. गोरगरीब पददलीतांच्या अडचणी सोडवाव्या. त्यांच्याप्रती सामाजीक दायीत्वाची जाण ठेवावी. कार्यकर्त्यांनी सर्वच स्तरावर मदतीचा हात द्यावा अशा सुचना बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. यावेळी महेंद्र ताजणे, शेषराव मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले. तसेच पक्षवाढीसाठी आपण सर्वांनी अहोरात्र मेहनत घेवून गाव तेथे शाखा असा उपक्रम राबवावा. व पक्ष मजबुत करावा. लोकनेते, संघर्षनायक रामदास आठवले यांचे हात मजबुत करावे. याप्रसंग रिपाइं आठवलेेच्या मंगरुळपीर तालुका अध्यक्षपदी सेवानिवृत्त तुकाराम खडसे यांची नियुक्ती करण्यात आली.
    बैठकीला कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, जेष्ठ कवी साहित्यीक महेंद्र ताजणे, सिने अभिनेता अरविंद उचित, युवा नेते गजानन खरात, मालेगाव तालुका अध्यक्ष प्रकाश गवई, रिसोड तालुका अध्यक्ष हिरामन साबळे, मंगरुळपीर तालुका अध्यक्ष तुकाराम खडसे, सौ. आशाताई खडसे, सचिन सुर्वे, शाहीर लोडजी भगत, शाहीर दत्ता वानखडे, मानोरा तालुका अध्यक्ष माणिकराव जामनीक यांची उपस्थिती होती.