Ticker

6/recent/ticker-posts

सौ. शिला मेश्राम यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यपदी निवड करा - भाई जगदीश इंगळे


सौ. शिला मेश्राम यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यपदी निवड करा - भाई जगदीश इंगळे
मानवी हक्क सुरक्षा दलाचे राज्यपालांना निवेदन
वाशीम - भारतीय राज्यघटनेच्या १६३ (२) कलमानुसार मानवी हक्क सुरक्षा दलाच्या क्रियाशिल नेत्या तथा सामाजीक कार्यकर्त्या सौ. शिलाताई मेश्राम यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्याच्या मागणीसाठी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश इंगळे यांच्या पुढाकारात १० जुन रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन पाठविण्यात आले.
    निवेदनात नमूद केले आहे की, राज्यातील दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर लोकांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्य करणार्‍या मानवी हक्क सुरक्षा दलाच्या महिला अध्यक्षा तथा झोपडपट्टी बचाव आंदोलन कृती समितीच्या मुख्य संयोजिका सौ. शिलाताई मेश्राम यांना विधान परिषदेवर राज्यपाल सदस्य म्हणून नियुक्त करणेबाबत भारतीय राज्यघटनेच्या १६३ (२) कलमानुसार राज्यपालांनी आपल्या स्वेच्छाधिकाराप्रमाणे निर्णय घेवून नियुक्ती करावी. जेणेकरुन आतापर्यत संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार संविधानात्मक मार्गाने दुर्बल घटकात राहणार्‍या लोकांसाठी लोकांच्या गरजा लक्षात घेवून लोकांच्या न्याय हक्कासाठी लोकसहभागातून राज्यभर यशस्वीपणे निस्वार्थ कार्य केले. सौ. शिला मेश्राम यांनी सामाजीक कार्याचा वसा वाहून नेण्यासाठी स्वत: गृहत्याग करुन समाजसेवेचा निर्णय घेतला आहे. सन २०१९ वर्षाच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये बडनेरा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवून चौथ्या क्रमांकाचे मत मिळविले. कोणत्याही आमिषाला बळी न पडता भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानुन आयुष्यभर सेवा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. सद्यस्थितीत त्या मानवी हक्क सुरक्षा दल, भारतीय दलित आदिवासी पँथर सेना तसेच झोपडपट्टी बचाव आंदोलन कृती समितीच्या मुख्य संयोजिका म्हणून राज्यभर काम करत आहेत. भारतीय राज्यघटनेच्या १६३ (२) कलमानुसार राज्यपाल यांना प्राप्त झालेल्या स्वेच्छाधिकाराप्रमाणे जर दुर्बल घटकातील लोकांच्या न्याय हक्कासाठी काम करणार्‍या महिलेला जर विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून जर संधी मिळाली तर अजून त्यांना काम करण्यास बळ निर्माण होईल. म्हणून संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या विनंतीवरुन सौ. शिला मेश्राम यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड करावी अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर अध्यक्ष भाई जगदीश इंगळे, प्रदेश अध्यक्ष सौ. भारतीताई डुरे, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष ब्रम्हानंद पारधे, केंद्रीय सदस्य यादवराव भगत, महिला अध्यक्षा सुमनबाई धवसे, वाशीम जिल्हाध्यक्षा कल्पनाताई इंगळे आदींच्या सह्या आहेत.