Ticker

6/recent/ticker-posts

प्रतिकारशक्ती वाढविणारी होमिओपॅथीक औषधी मोफत उपलब्ध : मानवसेवा फाऊंडेशन व डॉ. राजीव अग्रवाल यांचा पुढाकार : पुसद नाका स्थित श्री साई क्लिनिकमधून घेवून जाण्याचे आवाहन


प्रतिकारशक्ती वाढविणारी होमिओपॅथीक औषधी मोफत उपलब्ध : मानवसेवा फाऊंडेशन व डॉ. राजीव अग्रवाल यांचा पुढाकार : पुसद नाका स्थित श्री साई क्लिनिकमधून घेवून जाण्याचे आवाहन
वाशीम - नोवेल कोविड-१९ या विषाणूपासून होणार्‍या कोरोना या आजारावर मात करण्यासाठी मानवसेवा फाऊंडेशनच्या सेवाभावी उपक्रमांतर्गत अध्यक्ष डॉ. राजीव अग्रवाल यांच्या पुढाकारातून केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या व शरीरातील रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी) वाढविण्यासाठी प्रभावी ठरणार्‍या होमिओपॅथीक औषधीचे वितरण जिल्हाभरातील नागरीकांना करण्यात आले. आतापर्यत जवळपास २ हजार लोकांना या औषधीचे निशुल्क वितरण करण्यात आले असून ५ हजार व्यक्तींपर्यत ही आरोग्यदायी औषधी पोहचविण्याचा मानस डॉ. राजीव अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. सदर औषधी नागरीकांनी शहरातील पुसद नाका स्थित श्री साई क्लिनिकमधून घेवून जाण्याचे आवाहन डॉ. अग्रवाल यांनी केले आहे.
    कोरोना विषाणूच्या महामारीचा संसर्ग वाढू नये व या विषाणूची साखळी नष्ट व्हावी यासाठी जिल्हयात येत्या ३१ मे पर्यत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले असून पोलीस प्रशासन या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी झटत आहेत. तर आरोग्य विभाग कोविड-१९ आजाराची लक्षणे असलेल्या संशयास्पद व्यक्तींचा उपचार करत आहेत. अशा परिस्थितीत पोलीस विभाग, आरोग्य यंत्रणा असे विविध घटक जनतेचा जीव वाचविण्यासाठी कार्य करत आहेत. या लॉकडाऊनमध्ये नागरीकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक औषधीचे वितरण मानवसेवा फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाभरात करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी संस्था अध्यक्ष डॉ. राजीव अग्रवाल हे परिश्रम घेत असून नागरीकांनी संस्थेच्या पुसद नाका स्थित तुर्के कॉप्लेक्समधील डॉ. राजीव अग्रवाल यांच्या श्री साई क्लिनिक वाशीममध्ये जावून ही औषधी मोफत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.