पोलीस बांधवांना १५ लिटर सॅनिटायझर व ६०० मास्कची भेट
एसडीपीओ, शहरी व ग्रामीण कार्यालयाला वितरण
अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा सेवाभावी उपक्रम
वाशीम - कोरोनापासून नागरीकांच्या संरक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कडक उन्हात रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य पार पाडणार्या पोलीस बांधवांना या आजारापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने येथील अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनच्या सेवाभावी उपक्रमाअंतर्गत १५ लिटर सॅनिटायझर व ६०० मास्कचे वितरण करण्यात आले. यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी पुढाकार घेतला होता.
जगभरात प्रेताचे रतीब रचणार्या कोरोना महामारीने भारताच्या उंबरठ्यावर आपले पाय ठेवताच भारत सरकारने सावधानतेचा उपाय म्हणून साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संपूर्ण देश लॉकडाऊन केला. यासोबतच सर्वत्र संचारबंदी, जिल्हाबंदी, गावबंदी यासारखे उपायही योजण्यात आले. या उपायाच्या अंमलबजावणीसाठी सीआरपीएफ, राज्य राखीव दलाच्या जवानांसह पोलीस विभागही रस्त्यावर उतरला आहे. पोलीस विभागाच्या वतीने ठिकठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले. केवळ कायद्याची अंमलबजावणीच नव्हे तर नागरीकांना या आजाराची माहिती व्हावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विविध पध्दतीने जनजागृतीही करण्यात येत आहे. यासोबतच नियम मोडणार्यांवर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. कोरोना आजारापासून नागरीकांचे संरक्षण व्हावे यासाठी शासन, प्रशासन, आरोग्य विभागाच्या सेवेसह पोलीस विभागाचे जवान उन्हाळ्याच्या कडक उन्हात आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. या पोलीस बांधवांप्रती आपल्या सामाजीक कर्तव्याची जाणीव ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकिय व सामाजीक सेवाकार्यात अग्रेसर असलेल्या अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनला प्रत्येकी ५ लिटर सॅनिटायझर व २०० मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी संबंधीत पोलीस अधिकारी आपल्या कर्तव्यावर असल्याने भ्रमणध्वनीवरुन त्यांची परवानगी घेवून संघटनेचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे, पत्रकार संदीप पिंपळकर, अमोल अवताडे, वैभव वैद्य, पवन लाखे यांच्या हस्ते ही सामुग्री कार्यालयात उपस्थित अधिकार्यांच्या सुपुर्द करण्यात आली. अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशन या सेवाभावी उपक्रमाचे वैद्यकिय व सामाजीक क्षेत्रातून कौतूक होत आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ