Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात कोरोनाचे तीन हजार तीनशे एक रुग्ण बरे होऊन घरी : ५९ टक्के रुग्ण लक्षणे विरहित : केवळ ५ टक्के रुग्ण गंभीर स्वरुपाचे


राज्यात कोरोनाचे तीन हजार तीनशे एक रुग्ण बरे होऊन घरी
५९ टक्के रुग्ण लक्षणे विरहित : केवळ ५ टक्के रुग्ण गंभीर स्वरुपाचे
मुंबई, दि. ७ : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या  १७ हजार ९७४ झाली आहे. आज  १२१६ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  २०७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात   ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ०२ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ हजार ८८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १७ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख १२ हजार ७४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 राज्यातील विविध रुग्णालयात भरती असलेल्या ८८१६ रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या तीव्रतेनुसार विश्लेषण केले असता पुढील निष्कर्ष समोर आले आहेत. या एकूण भरती रुग्णांपैकी ५२२८ ( ५९ टक्के) रुग्ण हे लक्षणे विरहित आहेत. ३२०९ (३६ टक्के) रुग्ण हे सौम्य ते मध्यम लक्षणे असणारे आहेत. तर ४२४ ( ५ टक्के) रुग्ण हे गंभीर स्वरुपाचे असून त्यातील २३६ ( ३ टक्के)  रुग्ण ऑक्सिजनची आवश्यकता असणारे आहेत तर ९२ (१ टक्के) रुग्णांना व्हेंटीलेटरची आवश्यकता लागलेली आहे. उर्वरित ९६ रुग्ण  इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात भरती आहेत.
 आज राज्यात ४३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६९४ झली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २४, पुण्यातील ७ , वसई विरार मध्ये ५, सोलापूर शहरात २, अकोला शहरात १, पालघरमध्ये १ आणि  औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.  याशिवाय मणिपूरमधील १ आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.
 आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ४३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २५  रुग्ण आहेत तर १४  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ४३ रुग्णांपैकी २९ जणांमध्ये  (६७  टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६९४  झाली आहे.