दारुविक्रीमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला : जिल्ह्यात दारुबंदीची लखनसिंह ठाकुर यांची मागणी : जिल्हाधिकार्यांना निवेदन
वाशीम - जगात मनुष्याचे अस्तित्वच संपवु पाहणार्या कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी सरकारने भारतात तिसर्या टप्यात १७ मे पर्यत संपुर्ण लॉकडाऊन घोषीत केले आहे. यासोबतच महाराष्ट्र सरकारच्या वतीने युध्दपातळीवर विविध उपाययोजना केल्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्युदर खालावला असून संसर्गाचा धोकाही कमी झाला आहे. गेल्या २५ मार्चपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने सुरु असली तरी लॉकडाऊनच्या तिसर्या टप्यात सरकारने काही दुकानंासह दारु विक्रीच्या दुकानांनाही परवानगी दिली आहे. गेल्या दीड महिन्यापासून दारुची दुकाने बंद असल्यामुळे दारुमुळे उद्भवणारे सामाजीक गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार आदींचा आलेख शुन्यावर आला होता. मात्र जिल्ह्यात ४ मे पासून दारुविक्रीची दुकाने सुरु झाल्यामुळे शारीरीक अंतर, सामाजीक अंतराचे भान दारु पिणार्यांना राहणार नाही.. यायोगे कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा तीव्र स्वरुपात बळावला आहे. अशा गंभीर स्थितीमध्ये शासन, प्रशासन, पोलीस आदींच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्या जाण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेवून महत्प्रयासाने ग्रीन झोनमध्ये स्थिरावलेल्या वाशीम जिल्हयाची वाटचाल पुन्हा रेड झोनमध्ये होवू नये यासाठी वाशिम जिल्ह्यात लॉकडाऊन संपेपर्यत दारुविक्रीची दुकाने पुर्णत: बंद ठेवावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ६ मे रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले आहे.
राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाच्या समूह संसर्गाला नेमकी सुरुवात झालेली आहे. सध्यातरी आपला जिल्हा हा कोरोना मुक्त जिल्हा म्हणून कौतुकास पात्र ठरला आहे. कोरोनाचे संकट दिवसंदिवस रुद्र रूप धारण करीत असुन कोरोना बाधित रूग्णाच्या संख्येत वाढ होतच आहे. परंतु ५ मे पासून जिल्हयाच्या चौकाचौकातील दुकानासमोर एकच झुंबड दिसत आहे. यामध्ये फिजिकल डिस्टेंस, सोशल डिस्टेंसची संपूर्ण ऐसीतैसी होत आहे. अशा परिस्थितीत जिल्हयात कोरोना समुह संसर्गाचा धोका डोके वर काढण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा विचार करुन प्रशासनाने जिल्हयात कोरोना संसर्गाचा धोका कमी होईपर्यत दारुविक्रीची दुकाने पुर्णपणे बंद ठेवावी अशी मागणी ठाकुर यांनी केली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ