कारंजात अन्नदान आणि जलदानातुन हजारो भुकेल्या जिवांना दिलासा : उपक्रमाला महिनाभरापासून सुरुवात
श्री गुरुमंदीर देवस्थान व संत गाडगेबाबा विचारमंचचा पुढाकार
वाशीम - जिल्हयात जवळपास दोन महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या श्रमिक वर्गापुढे पोटाची भुक कशी मिटवावी हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारंजा तालुक्यातही हीच परिस्थिती असून या भुकेल्या पोटाचंी क्ष्ाुधा शांत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, समाजसेवक पुढे सरसावले असून स्वखर्चाने किंवा सामुहिक खर्चाव्दारे कारंजात ठिकठिकाणी अन्नदानाची सर्वात मोठी सेवा करण्यात येत आहे. या अन्नदानाच्या सेवेत संत गाडगेबाबा विचारमंच व श्री गुरुमंदीर देवस्थानाने पुढाकार घेतला असून महिनाभरापासून या संस्थेचे स्वयंसेवक गरजुपर्यत अन्न पोहचवित हजारो भुकेल्या जिवांचा दिलासा देत आहेत.
करोना संसर्ग होवू नये या दृष्टीकोनातून सुरु केलेल्या लॉकडाऊन दरम्यान अनेक समस्या उभ्या राहील्या आहेत. त्यामध्ये हातावर पोट असणार्या गोरगरीबांच्या भुकेचा प्रश्न सर्वात मेाठा होता. या भुकेल्या जिवांना पोटभर अन्न मिळावे यासाठी शहरातील संत गाडगे बाबा विचारमंच बहुउद्देशीय संस्था आणि श्री. गुरुमंदीर देवस्थान यांच्याकडूम गरजूंपर्यंत अन्न पोहचविण्याचा स्तुत्य ऊपक्रम हाती घेण्यात आला. गुरुमंदिर संस्थान कारंजा देवस्थानच्या वतीने पंतप्रधान निधीमध्ये तब्बल २१ लाखाची मदत करण्यात आली होती. त्यानंतर गरजुंप्रती आपली जबाबदारी ओळखून दररोज गुरुमंदिर देवस्थानकडून अन्न तयार केल्यानंतर संस्थांच्या वाहनामधूनच गरजुंपर्यत पोहचविण्याचे कार्य संत गाडगेबाबा विचारमंचचे अध्यक्ष, सचिव व स्वयंसेवक भर दुपारच्या उन्हातही करत आहेत. हा सेवाभावी उपक्रम महिनाभरापासून सुरु असून अन्नाचे पाकीटे तयार करण्यात संस्थानचे कर्मचारी तसेच समाजसेवेची जाण असलेले प्रवीण जोशी, श्रीपाद कुलथे, श्याम देशमुख, किशोरभाऊ मुक्कामवार यांचा हातभार लागत आहे. गुरुमंदीराचे विश्वस्त व परिसरातील नगरसेवक तथा श्री गुरुमंदीर देवस्थान कारंजाचे सेवेकरी प्रसन्ना पळसकर, तसेच अविनाश खेडकर, निलेश घुडे व पंकज कर्वे हे या स्वंसेवकांच्या पाठीशी ठरमपणे उभे असून गरजूंच्या यादीमध्ये रोजच वाढ होते आहे. परंतू या मदतीमध्ये कोणताही आळस न करता प्रसन्ना पळसकर यांच्या प्रेरणेने हे पवित्र कार्य शासन व पोलीस प्रशासनाचे सर्व नियम आणि सामाजीक अंतर पाळून उत्तमरित्या सुरु असून लॉकडाऊन संपेपर्यत ही सेवा सुरुच राहणार असल्याचे विचारमंचचे सचिव रोहीत देशमुख यांनी सांगीतले. या उपक्रमाचे तहसिलदारांसह नागरीकांनी कौतूक केले आहे.
प्रत्येकाला सेवेची संधी मिळवून देणे आणि शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळुन प्रत्येकाचा योग्यकामी ऊपयोग करुन घेणे जरुरी आहे. यासाठी आमच्याकडून नियोजनपूर्ण काम केले जात आहे अशी माहिती विचारमंचचे सदस्य सविज जगताप, रितेश देशमुख, सुरेश तिडके, भारत हँडगे, राहुल देशमुख, अजिंक्य जवळेकर, वल्लभ जगताप, मनोज काळे यांनी यावेळी दिली. गरजुंपर्यत अन्न पोहचवून त्यांच्या भुकेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही स्वार्थाशिवाय सुरु केलेल्या या उपक्रमात शहरातील प्रतिष्ठीत तसेच समाजकार्याप्रती सहानुभूती बाळगणार्यांनी मदत करुन आपले सामाजीक ऋण फेडावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंगडे तसेच सचिव रोहित देशमुख यांनी यावेळी केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ