लॉकडाउनमधील कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध’ मार्गदर्शिकेचे प्रकाशन : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि आयजेएम यांचा संयुक्त उपक्रम
मुंबई दि. २२: ’महाराष्ट्र राज्य महिला आयोग’ आणि ’इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ (आयजेएम) यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाउन काळातील कौटुंबिक हिंसाचार: सामना व सुरक्षिततेचे उपाय’ याविषयीच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन काल महिला व बालविकास मंत्री डॉ. यशोमती ठाकूर यांनी व्हिडीओ काँन्फरन्सच्या माध्यमातून केले. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा, महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंध कक्षाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, निवृत्त न्यायमुर्ती रोशन दळवी, आयजेएमच्या संचालिका मेलिसा वालावलकर, टाटा सामाजिक संस्थेच्या तृप्ती पांचाळ, राज्य महिला आयोगाचे अधिकारी, कर्मचारी आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करणार्या विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनीधी सहभागी झाले होते.
लॉकडाउन काळातील कौटुंबिक हिंसाचार: सामना व सुरक्षिततेचे उपाय’ या महिलांसाठी मार्गदर्शक पुस्तिकेत हिंसाचार टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, सुरक्षेच्या उपाय योजना, दैनंदिन मानसिक शारिरीक स्वास्थ राखण्यासाठी सुचना, मुलांचे संगोपन, दुदैवाने हिंसा झाली तर त्यातुन सुटका करण्यासाठी मार्गदर्शन यासोबतच राज्यातील वन स्टॉप सेंटरची यादी, महिला व बाल विकास कक्षांचे पत्ते, महत्वाचे संपर्क, हेल्पलाईन क्रमांक, ईमेल आदीचा समावेश आहे. ही पुस्तिका मराठी व इंग्रजी या दोन भाषांमधे तयार करण्यात आली असुन राज्य महिला आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली ही पुस्तिका समाजसेवी संस्थाच्या माध्यमातून महिलांना व्हाँटस अप, ईमेलद्वारे पाठविण्यात येणार आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ