आदितीच्या कोरोना जनजागृती गिताने आसमंत झाला मंत्रमुग्ध : रेडीओ वत्सगुल्मवर गायन
गितातून कोरोना प्रतिबंधक उपायाची माहिती : ठाणेदार सोनुने यांनी केले कौतुक
मालेगाव - नागरीकांचा कोरोनापासून बचाव व्हा या दृष्टीकोनातून अनेक जण आपआपल्या कलागुणांच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत. या जनजागृतीमध्ये लहान मुले मुलीही मागे नाहीत. कुणी कोरोना जनजागृतीची चित्रे रेखाटत आहे तर कुणी विविध गितांची रचना करत आहे. याच अनुषंगाने शहरातील पत्रकार प्रशांत लोखंडे यांची मुलगी कु. आदीतीने वडील प्रशांत लोखंडे, मराठी पत्रकार परिषद व पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनात कोरोना जनजागृतीवर अप्रतीम गिताची रचना करुन विविध ठिकाणी या गिताचे गायन केले आहे. या गितातील शब्दांमधुन आदितीने नागरीकांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेची माहिती देवून सर्वानी आपआपल्या घरीच राहून कोरोनापासून स्वत:चा बचाव करा असा मोलाचा संदेश दिला आहे. शहरातील शिव चौक येथे ८ मे रोजी मराठी पत्रकार परिषद व पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून आदीतीने ‘इस जमाने मे न जाने क्यू लोग घरोसे निकला करते है !’ हे गित सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. आदीतीच्या या गाण्याला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला. यासोबतच आदितीच्या गिताची रेडीओ वत्सगुल्मने दखल घेवून तिला रेडीओवर गीतगायन करण्याची संधी दिली. आदीतीने या संधीचे सोने करुन रेडीओ वत्सगुल्मवर केलेले गीतगायन हजारो श्रोत्यांनी ऐकून तीला दाद दिली आहे.
यावेळी ठाणेदार आधारसिंग सोनोने, तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे, सचिव शिवाजीराव खडसे, जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंतराव अवचार, इम्रानखान, गणेश मोहळे, यशवंतराव हिवराळे, प्रशांत लोखंडे, किरण पखाले, सेवाराम आडे, संदीप भातुडकर, चंद्रकांत गायकवाड, दीपक सारडा, सुभाष बळी, दत्तात्रय शिंदे, नायक, पोलीस कॉस्टेबल रामविलास गुप्ता, गोपनीय शाखेचे सुधीर सोळंके, कु. राखी लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी ठाणेदार सोनोने यांनी कु. आदितीच्या गिताचे कौतूक करुन पुष्पगुच्छ देवून तीचा सत्कार केला. तसेच कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी नागरीकांनी लॉकडाऊनच्य नियमाचे पुरेपुर पालन करुन आपआपल्या घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ