युवकांनी उद्योजक व्हावे - माजी आ. अॅड. विजय जाधव
उद्योग भरारी उपक्रमाचे फेसबुक लाईव्ह उदघाटन : ना. गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य
वाशीम - केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री व्यंकटेश सेवा समिती वाशीमच्या वतीने उद्योगभरारी हा नविन उपक्रम सुरू करण्यात आला असुन या उपक्रमाचे उदघाटन फेसबुक लाईव्ह करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार व शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक अँड विजयराव जाधव तर उदघाटक म्हणून केव्हीआयसी बोर्डाचे चिंतामणी गुट्टे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सी.ए. एम. जे. भोयर हे होते. यावेळी बोलतांना गुट्टे म्हणाले की, लॉकडाउनच्या नियमाचे पालन करत सामाजीक अंतर ठेवून फेसबुक लाईव्ह उद्घाटन झालेल्या या उपक्रमामुळे नविन उद्योग करणार्यांना या उपक्रमाचा खुप फायदा होणार आहे. उद्योग सुरु करणार्यांना लागणारे कागदपत्रे तसेच त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच उद्योगासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन केले. तर भोयर यांनी उद्योगासाठी लागणारे अर्थसहाय्य तसेच त्याविषयी लागणारे कागदपत्रे, प्रकल्प अहवाल, वित्तीय संस्थाची माहिती, वित्तीय पुरवठा कसा होईल तसेच त्यासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अॅड. विजय जाधव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून उद्योगातूनच देशाचा विकास नक्कीच होऊ शकेल. तसेच गावातील गरीब तरुणांना उद्योग सुरु करून त्यातून स्वावलंबी होऊन नविन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. त्या उद्देशानेच या उपक्रमाची सुरवात केली असुन या माध्यमातून सूक्ष्म व लघु उद्योगाची माहिती, तज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगाची निवड, शासकीय योजनाची माहिती, प्रकल्प अहवाल, वित्तीय संस्थाची माहिती व वित्तीय पुरवठा त्यासाठी पाठपुरावा व ऑनलाईन नोंदणी व कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी या उपक्रमातून सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तरी वाशीम जिल्ह्याला उद्योगयुक्त जिल्हा बनवून आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी उद्योजकांनी पुढे येऊन या संधीचा लाभ घ्यावा तसेच नविन उद्योग सुरु करणार्याना संस्थेचे कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली नाका वाशीम येथे श्री महेश धोंगडे मो. ८८८८१२८४४० यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले.
यावेळी विक्रीकर अधिकारी राजेश बदर, संस्थेचे संचालक तथा प्रकल्पप्रमुख राम जाधव, संचालक अजिंक्य जाधव, सामाजिक कार्यकर्ते धनंजय रणखांब, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत जोशी यांनी तर आभार प्रदर्शन राम जाधव यांनी केले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ