त्या पतसंस्थेच्या फसवणूकीबाबत तक्रार नोंदवा : आर्थिक गुन्हे शाखा वाशीमचे ठेवीदारांना आवाहन
वाशिम : श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को. ऑप सोसायटी लि. लासलगावचे संचालक सतीश पोपटराव काळे व इतर सहा आरोपींनी मंगरूळपीर शाखेत अपहार केल्याच्या फिर्यादीवरून मंगरूळपीर पोलीस स्टेशन येथे अप. नं. २६९/१८ कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वाशिम आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
या गुन्ह्याच्या संबंधाने वाशिम जिल्ह्यातील ज्या ठेवीदारांची श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को. ऑप सोसायटी लि. लासलगाव, जि. नाशिकच्या वाशिम जिल्ह्यातील विविध बँक शाखांकडून फसवणूक झालेली आहे, अशा ठेवीदारांनी ५ जून २०२० रोजी पर्यंत संबंधित सर्व कागदपत्रांसह वाशिम आर्थिक गुन्हे शाखा येथे समक्ष येवून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन वाशिम आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. या गुन्ह्याच्या तपासी अधिकार्यांचा संपर्क क्रमांक ९८२२००६८५४ असा आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ