विदेशात अडकलेल्या भारतीयांना डॉ. धनंजय दातार यांचा मदतीचा हात
गरजुंचा विमान प्रवास व चाचणी खर्चाचा भार उचलण्याचा निर्णय
वाशीम - कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन व हवाई वाहतुक बंद झाल्याने संयुक्त अरब अमीरातीत अडकलेल्या हजारो भारतीयांना भारतात आणण्यासाठी अल अदील समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी पुढाकार घेतला असून या भारतीयांचा विमान प्रवासाचा खर्च आणि भारतात आल्यानंतर त्यांच्या कोविड चाचणीच्या खर्चाचा भार उचलण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात भारत व संयुक्त अरब अमीरातीची विमानसेवा नुकतीच पुर्ववत सुरु झाली असून विमानाच्या तिकीटाचे बुकिंग व मायदेशी परतू इच्छिणार्या भारतीयांची कॉन्सुलेटकडे नावनोंदणीही सुरू आहे. मात्र लॉकडाऊनला तोंड देताना अनेक भारतीयांकडील पैसे संपून गेले आहेत. अशा गरजूंच्या तिकीट खर्चाचा तसेच त्यांच्या कोविड चाचणीच्या शुल्काचा वाटा डॉ. दातार उचलणार आहेत.
यासंदर्भात डॉ. दातार म्हणाले की, परदेशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला पुढाकार संपूर्ण जगभरात अशा स्वरुपाचा सर्वांत मोठा व व्यापक उपक्रम आहे. कोविड साथीमुळे जगभर आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. आखाती देशांत शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी गेलेले अनेक भारतीय लॉकडाऊनमुळे तेथेच अडकून पडले आहेत. यात नोकर्या गमावलेल्या कामगारांचे प्रमाणही मोठे आहे. हवाई वाहतूक बंद झाल्यामुळे या लोकांपुढील अडचणी आणखी वाढल्या होत्या. या स्थितीत आपल्या देशबांधवांना सामाजिक बांधीलकीच्या हेतूने सर्वतोपरी मदतीचा निश्चय मी व माझ्या समूहाने केला आहे. ते पुढे म्हणाले, हे सहाय्य करताना आम्ही संबंधित यंत्रणांची मंजुरी घेऊनच समन्वय साधत आहोत आणि त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचेही कठोर पालन करत आहोत. यासंदर्भात मी संयुक्त अऱब अमिरातीतील भारताचे कॉन्सुलेट जनरल श्री. विपुल यांच्याशी चर्चा केली आहे. या भारतीयांना मायदेशी परतण्यात सहकार्य करणार्या सर्वांप्रती मी आभार व कृतज्ञता व्यक्त करतो.
डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली अल अदील ट्रेडिंग ने ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून स्वतःच्या पिकॉक या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहेत. अल अदील समूहाचे ४३ आऊटलेट्स, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त २ पिठाच्या गिरण्या व २ मसाला कारखाने असे जाळे दुबई, अबूधाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून ओमान, बहारीन व सौदी अरेबियामध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे.
डॉ. दातार यांनी विविध संस्था व अनेक व्यक्तींना मदत करुन सामाजिक बांधीलकीही जपली आहे. भारतीय संस्कृतीचे आखाती देशांमध्ये संवर्धन करण्यात ते आघाडीवर आहेत. दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते अधिकाधिक मदत करतात. त्यांना मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ