Ticker

6/recent/ticker-posts

खरीप हंगामात शेतकर्‍यांना त्वरीत पीक कर्ज वाटप करण्याची मागणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन : प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांचा पुढाकार


खरीप हंगामात शेतकर्‍यांना त्वरीत पीक कर्ज वाटप करण्याची मागणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन : प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांचा पुढाकार
वाशीम - उन्हाळा संपताच जुन महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे वेध लागून खरीप हंगामात शेतकर्‍यांची पेरणीची लगबग सुरु होते. अशावेळी पेरणीसाठी लागणार्‍या अत्यावश्यक शेतीउपयोगी सामान घेण्यासाठी जिल्हयातील शेतकर्‍यांना त्वरीत पिककर्ज वाटप करण्याची  मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात करण्यात आली आहे. मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात २७ मे रोजी जिल्हाधिकार्‍यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
 निवेदनात नमूद आहे की, राज्यामधील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकामार्फत वाशीम जिल्हयातील पिक कर्ज योजनेअंतर्गत १६०० कोटीचे कर्जवितरण करण्याचा इष्टांक ठरविला आहे. यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेने १३० कोटीचे व राष्ट्रीयकृत बँकांनी ३१ कोटीचे कर्ज आतापर्यत १७१७७ शेतकर्‍यांना वितरीत केले आहे. हे वितरण अल्पसे आहे. या कर्जवितरणाला गती वाढविणे आवश्यक आहे. पीक पेरणीचा नजीकचा काळ तसेच शेतकर्‍यांच्या आर्थीक अडचणी व उपलब्ध असलेल्या कमी कालावधी या बाबी विचारात घेवून राष्टीयकृत बँका व सहकारी बँकांनी कामाची गती वाढवून जास्तीत जास्त शेतकर्‍यांना लाभ देण्याची कार्यवाही व उद्दीष्टपुर्ती करण्यात यावी. पीक कर्जाबाबत त्वरीत कार्यवाही करुन शेतकर्‍यांना न्याय द्यावा. अन्यथा पुढील काळात शेतकर्‍यांच्या हितासाठी मनसेकडून आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदन देतांना प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, मानोरा तालुका अध्यक्ष नितीन खडसे, गजानन वैरागडे आदी उपस्थित होते.