Ticker

6/recent/ticker-posts

राजाभैया पवार मित्रमंडळाकडून हजारो लोकांना थेट अन्नदानाची अविरत सेवा : वाल्मीकी मित्रमंडळ व जय लहुजी मित्रमंडळाचा सहभाग : मुक्या प्राण्यांनाही दिला दिलासा : तरुणांचे उस्फुर्त श्रमदान


राजाभैया पवार मित्रमंडळाकडून हजारो लोकांना थेट अन्नदानाची अविरत सेवा
वाल्मीकी मित्रमंडळ व जय लहुजी मित्रमंडळाचा सहभाग
दोन महिन्यापासून निस्वार्थ व अविरत जनसेवेचे घेतले व्रत
मुक्या प्राण्यांनाही दिला दिलासा : तरुणांचे उस्फुर्त श्रमदान
वाशीम - भुकेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीला अन्नदान करुन त्याची भुक शांत करणे म्हणजे निष्प्राण झालेल्या शरीरात प्राण फुंकून त्याला जिवनदान देण्याासारखे महान कार्य आहे. भुकेल्या जिवांच्या नजरेत अन्नदान करणार्‍या व्यक्तीची प्रतिमा देवदुतासारखी असते. जो संकटकाळी देवदुतासारखा धावून जातो. येथील सामाजीक सेेवेत कार्यरत राजाभैया पवार मित्रमंडळाचे स्वयंसेवकही लॉकडाऊनच्या आपातकालीन काळात देवदुतासारखे धावून जात शहरातील हजारो गोरगरीब लोकांना थेट अन्नदान वितरणाचे कार्य शासकीय नियम व सामाजीक अंतर पाळून निस्वार्थ भावनेने करीत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून अविरत सुरु असलेल्या अन्नदानाच्या या सेवेमुळे शहरातील हजारो गोरगरीबांना मोठा दिलासा मिळाला असून याही पुढे जावून मंडळाच्या वतीने मुक्या प्राण्यांनाही दिलासा देण्यात येत आहे. या पवित्र कार्यात वाल्मीकी मित्रमंडळ व जय लहुजी मित्रमंडळासह तरुणतुर्क, लहानथोर, महिला भगिनी उस्फुर्तपणे पुढे येवून श्रमदान करीत आहेत.
 भारताच्या उंबरठ्यावर कोरोना महामारीने पाऊल ठेवताच खबरदारीचा उपाय म्हणून २५ मार्चपासून संपुर्ण देशात लॉकड़ाऊन व संचारबंदी ठेवण्यात आली असून या संचारबंदीचा तिसरा टप्पा १७ मे पर्यत वाढविण्यात आला आहे. या काळात कामधंदे ठप्प पडल्यामुळे हातावर पोट असणारे गोरगरीब, मजुरवर्ग, पालात राहणारे असे अनेक घटक प्रभावित झाले असून त्यांच्या भोजनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा आपातकालीन परिस्थितीत अनेक दानशुर लोक या पिडीत घटकांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. या सेवेमध्ये राजाभैया मित्रमंडळाचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. समाजसेवक राजाभैय्या यांच्या संकल्पनेतुन शहरातील शेलु रस्त्यावरील मानमोठे नगरालगत असलेल्या अत्यंत गरीब वस्तीमध्ये तसेच छोटे छोटे फिरते व्यवसाय करुन आपले पोट भरणार्‍या शेकडो कुटुंबांना राजाभैया मित्रमंडळाच्या वतीने दररोज खिचडी, पुरी भाजी, भाजीपोळी, झुणकाभाकर ठेचा अशा स्वरुपात थेट अन्नदानाची सेवा दिल्या जात आहे. यासोबत जिल्हयाबाहेरुन पायपीट करुन जिल्ह्यात येणार्‍या नागरीकांनाही भोजन दिल्या जात आहे. या अन्नदान सेवेत दररोज ६० ते ७० किलो खिचडी बनवून तीनचाकी हातगाडीव्दारे वाटप केल्या जात असून या सेवेमध्ये अनेक लोक स्वयंस्फुर्तीने पुढे येवून श्रमदान करीत आहेत. यासोबतच पुसद नाका, हिंगोली नाका येथील परिसरासोबतच शहरात नागरीकांच्या सुरक्षेसाठी कडक उन्हाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावणार्‍या पोलीस बांधवांनाही खिचडीचे वाटप केल्या जात आहे.
 यासोबतच लॉकडाऊनमध्ये अन्नपाण्यासाठी व्याकुळ झालेल्या शहरातील गायी, कुत्रे आदी मुक्या प्राण्यांनाही मित्र मंडळाचे राजाभैया पवार, सुशील भिमजीयाणी, महादेव हरकळ, विक्रम बबेरवाल यांच्या श्रमदानातुन दररोज सायंकाळी ब्रेड, भात, बिस्कीट, पोळी आदी देण्यात येत आहे. या अविरत सेवेचे सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, प्रा. दिलीप जोशी, अनिल केंदळे, नितीन मडके, बिट्टु ठाकुर, संदीप धोटे, आशीष कोठारी, कमल जिवनाणी इत्यादी अनेक व्यक्ती, शासकीय अधिकारी, पोलीस अधिकार्‍यांनी भरभरुन कौतुक केले नव्हे या कार्यात सहभाग घेवून अनेक पोलीस अधिकार्‍यांनी स्वत: अन्नदानाच्या या महाकार्यात श्रमदान केले आहे. मंडळाच्या या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असून गोरगरीबांची सेवा करण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था, मित्रमंडळ स्वयंस्फुर्तीने पुढे येत आहेत. अन्नदानाच्या या पवित्र कार्यामध्ये सुशिल भिमजीयाणी, शाम सांबरे, महादेव हरकळ, राम गाभणे, रवि गुप्ता, सुजल गुप्ता, विनोद झांजोट, देवेश पवार, महेश धोंगडे, दिपक पवार, नकुल पवार, विरु बबेरवाल, विक्रम बबेरवाल, विशाल बबेरवाल, देवा पवार, विजय बोयत, सागर धामणे, शाम सांभरे, गोलु बबेरवाल, शुभम पवार, तुषार खडसे, विशाल कलोसे, कुणाल कलोसे, प्रथम पिवाल, शैलेश खडसे, दिपक साठे, शिवा कांबळे, तुषार खडसे यांच्यासह राजाभैया पवार मित्रमंडळ, वाल्मीकी मित्रमंडळ, जय लहुजी मित्रमंडळाचे स्वयंसेवक स्वयंस्फुर्तीने व कोणत्याही स्वार्थाशिवाय अन्नदान व श्रमदान करीत आहेत. गरजुंपर्यत अन्न पोहचवून त्यांच्या भुकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कोणत्याही स्वार्थाशिवाय सुरु केलेल्या या उपक्रमाचे शहरात कौतूक होत आहे.