करोनाचा प्रभाव कमी होईपर्यत दारुची दुकाने बंद ठेवण्याची सत्यशोधक समाजाची मागणी
सोशल डिस्टंंन्सिगचा अनादर व करोनाचा प्रभाव वाढण्याची भिती
वाशीम - राज्यात दारु दुकानांना परवानगी दिल्यामुळे तळीरामांकडून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचा अनादर व करोना संसर्गाचा धोका वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने महसुलाचा विचार न करता करोनाचा प्रभाव कमी होईपर्यत राज्यातील दारुविक्री बंद ठेवण्याची मागणी अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्या वतीने ६ मे रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, ५ मे पासून राज्यातील बहूतांश जिल्हयातील दारुची दुकाने उघडणयास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दारुविक्री दुकानांवर लोकाचंी गर्दी होत असून सामाजीक अंतराच्या नियमाची सर्रास पायमल्ली होतांना दिसत आहे. यामुळे करोना संसर्गाचा धोका वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. या महामारीला राज्यातुन हद्दपार करण्यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. यासाठी लॉकडाऊन नियमांचे तंतोतंत पालन होण्याची गरज आहे. आतापर्यत दारुची दुकाने बंद असल्यामुळे दारुड्यांचा उच्छाद बंद होता. मात्र ही दुकाने उघडताच दुकानांवरील गर्दीसह गल्लीबोळांमध्ये दारुड्यांचा वावर वाढला आहे. काहींनी अतिउत्साहाच्या भरात जास्त दारु पिऊन धिंगाणा घातल्याच्या घटनाही घडत आहेत. तसेच कोरोनाला आम्ही काय समजतो ? अशा प्रकारची भाषा वापरल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दारुविक्रीतून सरकारला जास्त महसूल मिळतो हे खरे असले तरी यातुन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होईपर्यत दारुविक्रीची दुकाने बंद ठेवावी अशी सत्यशोधक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ