युवकांनो, लॉकडाऊनची संधी साधुन तंबाखुचे व्यसन सोडा - अमोल काळे
३१ मे जागतिक तंबाखु सेवन विरोधी दिनानिमित्त आवाहन
वाशीम - कोरोनाच्या महामारीमुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन असतांना तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या या संधीचा उपयोग करुन युवकांनी तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे व्यसन कायमचे सोडून आपल्या जीवनाला नवा आकार द्यावा असे आवाहन बाकलीवाल विद्यालयाचे कलाशिक्षक अमोल काळे यांनी ३१ मे रोजी जागतिक तंबाखु सेवन विरोधी दिनानिमित्त केले आहे.
सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे तंबाखु व तंबाखुजन्यपदार्थ मिळत नाहीत. त्यामुळे बर्याच लोकांचे व्यसन सुटले आहे. व व्यसन सोडणार्या लोकांसाठी योगायोगाने ही एक संधी चालुन आली आहे. खर्रा सारख्या तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनाने कोरोनाची लागण झाल्याच्या काही घटना देशात उघडकीस आल्या आहेत. व्यसन ही आजकाल फॅशन झालेली असून व्यसन ही समाजाला लागलेली विषारी किड आहे. दिवसेंदिवस ही कीड वाढत चालली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम युवा व अल्पवयीन पिढीवर पडत आहे. तंबाखुजन्य पदार्थामुळे कॅन्सर सारखे घातक आजार होवून दरवर्षी हजारो लोक या आजाराला बळी पडतात. लोकांना या व्यसनापासुन दुर ठेवण्यासाठी शासन दरवर्षी कोट्यावधी रुपये जनजागृतीवर खर्च करुन लोकांना या व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच शासनाच्या गुटखाबंदीच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. तंबाखु खाऊन थुंकणे, पिचकारी मारणे, उघड़यावर, ऑफिसातील कोपरे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा असून व्यसनी व्यक्तीला क्षयरोग किंवा कोरोना असला तरी व्यसन न करणारेही या घातक आजाराला बळी पडतात. तसेच तंबाखुपासुन तोंडाचा कॅन्सर, हदयरोग, रक्तवाहीनीचा प्रवाह कमी होणे, दमा, खोकला आदी आजारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. या लॉकडाऊनमध्ये जो व्यक्ती दोन महिने व्यसनापासून दुर राहीला त्याचा आत्मविश्वास व जगण्याचा उत्साह वाढल्याचा दिसून येत आहे. व्यसनी व्यक्तींचे व्यसन सोडविण्यासाठी प्रबळ आत्मविश्वासासोबतच परिवाराचे सहकार्यही आवश्यक आहे. आपला परिवार, समाज आणि राष्ट्राप्रती आपली जबाबदारी ओळखून युवकांनी तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या जहरी व्यसनापासून सदैव दुर राहून आनंदी जिवन जगावे असे आवाहन शिक्षक अमोल काळे यांनी केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ