कोरोनामुळे नाभिक बांधवांचे जगणे धोक्यात : हायरिस्क संपर्काचा सलून व्यवसाय उठला मुळावर : वस्तर्याऐवजी हातात आले तराजु तागडे : सुरक्षाकिट पुरविण्याची शासनाकडे मागणी
वाशीम - सातासमुद्रापार चिनवरुन आलेल्या कोरोना या एका विषाणूने जगाच्या जगण्याची दिशाच बदलून टाकली असून थेट जीवनाला फुलण्याआधीच थेट मृत्युच्या दारात नेऊन उभे करण्याच्या या विषाणूच्या कार्यप्रणालीमुळे अनेकांच्या जगण्याला काटेकोर नियम लागु झाले आहेत. भारतातही या विषाणूने हाहाकार उडवला असून थेट संपर्काचा (हायरिस्क) व्यवसाय असलेल्या सलून व्यवसायीकांचे जगणे या एका विषाणूमूळे कायमस्वरुपी धोक्यात आले आहे. सामाजीक अंतरामुळे या विषाणूला जरी अटकाव बसत असला तरी ग्राहकांशी थेट संपर्क झाल्याशिवाय पोट भरणेच अशक्य असलेल्या सलून व्यवसायीकांच्या सुरक्षेकडे शासन गंभीरतेने पाहत नसल्यामुळे नाईलाजाने या नाभिक बांधवांना आपल्या हाती वस्तरे व कैचीऐवजी तराजु व तागडे घेवून पोट भरण्याची पाळी आली आहे. भारताच्या आर्थिक, सांस्कृतीक आणि सामाजीक जडणघडणीत महत्वाचा हिस्सा असलेल्या या सलून व्यवसायीकांना जगण्यासाठी शासनाने सुरक्षा किट पुरवावी अशी मागणी पुढे येवू लागली आहे.
हिंदु, मुस्लीम, सिख, ईसाई आदी विविध जाती, पंथ आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप असलेल्या भारतीय संस्कृतीतील वेगवेगळ्या व्यक्ती आपला पोशाख, राहणीमान आणि केशरचनेच्या विशिष्ट ठेवीनुसार ओळखले जातात. डोक्यावरील केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि आवडीनुरुप वेगवेगळ्या दाढीच्या आकारामुळे प्रत्येक मनुष्य आपल्या समाजात, व्यवसायात, मित्रपरिवारात, नातेवाईकात वेगळीच छाप पाडून जातो. मात्र यासाठी मनुष्याच्या जगण्याला सुंदरता देणार्या सलून व्यवसायीकांना आपले संपूर्ण कसब पणाला लावावे लागते. ग्राहकांची आवडनिवड जोपासुन व काळानुरुप आपल्या व्यवसायात बदल करुन सलून व्यवसायीक आपल्या ग्राहकांच्या व्यक्तीमत्वाला किंबहूना त्याच्या आर्थिक व सामाजीक विकासालाच एकप्रकारे हातभार लावत असतात. अशा भारतीय संस्कृतीतील व्यक्तीमत्व व वेशभूषेतील महत्वाचा भाग असलेला किंबहूना या घटकाच्या अस्तित्वाशिवाय जगणेच अशक्य असावे असा हा सलून व्यवसाय कोरोना विषाणूमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. कोरोनाला सामाजीक अंतराच्या चौकटीत बंदीस्त करुन नेस्तनाबूत करता येते. परंतु जिथे व्यवसायासाठी सामाजीक अंतराची चौकटच उध्दस्त करणे प्रमाण अशा सलून व्यवसायीकांच्या सुरक्षेची हमी शासनातील कोणताच घटक घेतांना आजघडीला दिसत नाही. त्यामुळे या सलून व्यवसायीकांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी त्रिशंकू अवस्था झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे सलून व्यवसाय ठप्प पडला असतांना परिस्थितीने हतबल होवून यातील अनेक सलून व्यवसायीकांना ठोस सुरक्षेअभावी हातात तराजु तागडे घेवून भाजीपाला व फळविक्रीचा व्यवसाय करावा लागत आहे.
भारतातील इतर जिल्हयाप्रमाणेच वाशिम जिल्हयातही हीच परिस्थिती असून जिल्हयातील ग्राम केकतउमरा येथील सलून व्यवसायीक संतोष सुरेकर यांच्या व्यवसायावरही कोरोनामुळे असेच भिषण संकट ओढवले आहे. चारचौघांप्रमाणे कठोर परिश्रमातून व गरीबीच्या संर्घातून सलून कला आत्मसात वाशीम येथे सलून व्यवसाय उभारलेल्या संतोष सुरेकर यांचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यापासून ठप्प पडला आहे. या दोन महिन्याच्या मोठ्या कालावधीत कुटुंबाला जगवायचे कसे ? हा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी हातात तागडे घेवून भाजीपाला विकण्यास सुरुवात केली आहे.
सलून व्यवसायामध्ये थेट सामाजीक संपर्क येत असल्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शासनाने सलून व्यवसायावर तात्पुरती बंदी घातली असली तरी काही जिल्हयात या बंदीला शिथीलता देण्यात आली आहे. परंतु एकीकडे ग्राहकांशी थेट संपर्कामुळे कोरोना संपर्काचा दाट धोका तर दुसरीकडे व्यवयासातून कुटुंबाच्या जगण्यामरण्याचा प्रश्न. या दोन धृवाच्या मध्ये सलून व्यवसायीक सापडला असून या व्यवसायीकांच्या सुरक्षेचे दायित्व कुणाचे ? असा सवाल विचारण्याची नामुश्कीही याच नाभिक बांधवांवर येवून पडली आहे.
आपल्या हाताने केसांना हवा तसा आकार देवून ग्राहकांचे व्यक्तीमत्व खुलविणार्या संतोष सुरेकर यांनी अशा कठीण प्रसंगी कुणापुढेही लाचार होवून मदत न मागता थेट आंबाविक्रीचा व्यवसाय स्विकारुन स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना यासाठी हिंगोलीचे व्यवसायीक व बंडूभाऊ उर्फ शंकर सुरशे डिग्रसकर व सुरेशभाऊ घेणेकर भरभक्कम आधार दिला. एकूणच परिस्थितीने हतबल न होता काळानुरुप व्यवसायात बदल करण्याच्या संतोष सुरेकर यांच्या दृढविश्वासाने इतर सलून व्यवसायीकांना प्रेरीत केले आहे. आपल्या व्यवसायाबाबत मनोगत व्यक्त करतांना संतोष सुरेकर म्हणतात की, कोरोना संकट नसून संधी आहे. कोरोनाने जशी जगण्याला नवी दिशा दिली तसेच विविध क्षेत्रातील उद्योगधंद्यांना मोठ्या संधी सुध्दा दिल्या आहेत. नाभिक समाज बांधवांनी ही संधी ओळखून आपल्या जगण्याला विकासाची नवी दिशा द्यावी.
एकूणच सचोटीने कलेचा व्यवसाय करणार्या संतोष सुरेकर सारख्या अनेक युवकांनी कोरोनाचा धोका ओळखून आपल्या व आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा मार्ग निवडला आहे. परंतु सलुन व्यवसायावर पुर्णत: निर्भर असणारे असे कित्येक संतोष सुरेकर दृढ आत्मविश्वासाने ही धोक्याची वाट निवडतील? जीवनातील महत्वाचा काळ ही सलून कला आत्मसात करण्यात घालविल्यावर पिढ्यानपिढ्यांचे जगणेच या व्यवसायावर अवलंबुन असलेल्या नाभिक बांधवांच्या सलुन व्यवसायाला सामाजीक अंतराची सुरक्षा मिळणार का ? त्यांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार? असे अनेक प्रश्न आपल्यासोबत अनेक दिवस, अनेक वर्षे आता कायमस्वरुपी सोबत राहणार्या शापीत कोरोनाने शासनासमोर, व्यवस्थेसमोर, समाजासमोर मांडून ठेवले आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ